आपला जिल्हा

हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते- रेणुका कोल्हे 

हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते- रेणुका कोल्हे 
शिंगणापूर येथे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२६विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरद्वारे समाज हितासाठी शिक्षण संस्था, युवा संघटना आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे हर सुंदर चित्र पाहून मन भरुन आले आणि अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते आणि सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात असे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा  रेणुका विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील शिंगणापूर गावात संजीवनी विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना मुख्यमंत्री समुद्र पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात
या प्रसंगी गावचे लोकनियुक्त  सरपंच डॉ.विजय काळे, ज्येष्ठ नेते यादवराव संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, उपसरपंच पती शाम संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर,सागर शिंदे, माजी सदस्य राजश्री काळे, अरविंद संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, माजी सरपंच भिमराव संवत्सरकर, सतीश निकम, सुनील शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे, शाळेचे मुख्याध्यापक खेमनर सर, संजीवनी विद्यापीठाचे प्रा चैतन्य काळे, प्रा गणेश फोपसे, प्रा सुप्रिया भागवत यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, गावातील अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य सेवक, डॉ सोनवणे, शिंगणापुर ग्रामपंचायत कर्मचारी वृंद जिल्हा परिषद शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
 गुरुवार ५ फेब्रुवारी ते शुक्रवार ६ फेब्रुवारी हे दोन दिवस शिंगणापूर गावात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत संजीवनी युवा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांचे स्मणार्थ मोफत फिरता तसेच संजीवनी आयुर्वेदा हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले तसेच या शिबिरात कामातून साध्य होणारी सामाजिक जाणीव सेवाभाव आणि सामूहिक जबाबदारी याचा अनुभव प्रत्येक उपस्थितांना आला.

जाहिरात

विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचे महत्व उपस्थितांना सांगितले तसेच संजीवनीच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा थेट त्यांच्या दारी मिळत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संजीवनी प्रधासनाच्या आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे