यशासाठी कठोर परीश्रमाची तयारी ठेवा – डॉ. मनाली कोल्हे

यशासाठी कठोर परीश्रमाची तयारी ठेवा – डॉ. मनाली कोल्हे
संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये जिल्ह्यास्तरीय मुलींच्या क्रिडा स्पर्धेस प्रारंभ

कोपरगांव विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२६-अहिल्यानगर जिल्ह्यातील पॉलीटेक्निक आणि डी. फार्मसी संस्थां मधिल मुलींच्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी संजीवनी के. बी. पी.पाॅलीटेक्नीकला मिळाली. या स्पर्धेच्या निमीत्ताने सांघिक आणि व्यक्तिगत क्रिडा कौशल्य दाखवीण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. जिवनात खिलाडु वृत्ती ठेवा. यशासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा असा संदेश या क्रिडा स्पर्धा देतात. असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ स्कुलच्या व्यवस्थापकीय संचालिका डाॅ.मनाली कोल्हे यांनी केले.

संजीवनी पाॅलीटेक्नीकच्या प्रशस्त मैदानावर, इंटर इंजिनिअरीग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्ट्स असोसिएशन(ई १ झोन) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पॉलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधिल मुलींच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ करताना त्या बोलत होत्या. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते . यावेळी ई १ झोनच्या प्रतिनिधी प्रा. आशा म्हस्के, प्राचार्य ए. आर. मिरीकर, जीमखाना विभाग प्रमुख नानासाहेब लोंढे आदि उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक मुलींनी व त्यांच्या संघ प्रमुखांनी या सोहळ्यास हजेरी लावली.

डाॅ.कोल्हे म्हणाल्या, सातत्याने केलेला सराव, शारीरिक तंदुरूस्ती, मानसिक स्थैर्य आणि तांत्रिक कौशल्य या स्पर्धांमधुन प्रकट होते. क्रीडा स्पर्धा म्हणजे आरोग्य, शिस्त , नेतृत्व, संघभावना आणि कौशल्य यांचा उत्सव असतो. प्राचार्य मिरीकर म्हणाले, संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा दृष्टिकोन होता. त्या दिशेने संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. प्रा.आय.के.सय्यद यांनी सुत्रसंचालन तर डाॅ.मोहिनी गुंजाळ यांनी आभारप्रदर्शन केले.

खेळाला करीअरचे रूप देण्यासाठी खेलो इंडिया, फिट इंडिया चळवळ, क्रीडा पायाभुत सुविधा विकास, तालुका आणि जिल्हा स्तरावर स्टेडियम तसेच प्रशिक्षण केंद्रे उभारणे, स्थानिक खेळांना प्रोत्साहन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट आहे. या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी अंतर्गत इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस् अँड मॅनेजमेंट (आयआयएसएम), मुंबई या संस्थेशी संलग्न स्पोर्टस् मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. संजीवनी युनिव्हर्सिटी अंतर्गत इंजिनिअरींगच्या विविध शाखांना इंजिनिअरींग डीप्लोमा केलल्या विद्यार्थ्यांना थेट द्वीतिय वर्षात प्रवेश दिला जातो. यात राज्यस्तरीय क्रीडा निपुणता धारक डीप्लोमा उत्तिर्ण खेळाडूंना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
अमित कोल्हे( प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी, कोपरगाव)



