वाढदिवस साजरा न करण्याचे ॲड.संदीप वर्पे यांचे कार्यकर्ते हितचिंतकांना आवाहन
वाढदिवस साजरा न करण्याचे ॲड.संदीप वर्पे यांचे कार्यकर्ते हितचिंतकांना आवाहन
कोणत्याही प्रकारचे शुभेच्छा फलक न लावण्याचे देखील आवाहन

कोपरगाव विजय कापसे दि २६ एप्रिल २०२५–नुकत्याच जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरिक्यानी निष्पाप भारतीयांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ नागरिकांनी आपला जीव गमवला तर अनेक जण जखमी झाले असून सर्वच भारतीय या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करत असून ही घटना अत्यंत निंदनीय असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तसेच अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष अँड संदीप वर्पे यांनी सोमवार दि २८ एप्रिल रोजी असलेला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.

अँड संदीप वर्पे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की भ्याड हल्ल्यामुळे सर्वाना मोठा धक्का बसला असून त्यामुळे आपण आपला आनंद साजरा करणे उचित होणार नाही म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी व हितचिंताचिंतकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फलक कुठेही लावू नये तसेच कोणत्याही प्रकारे शुभेच्छा सत्कार समारंभाचे तसेच मिठाई फळे मिष्ठान वाटपाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करू नये असे आवाहन अँड संदीप वर्पे यांनी करत हीच खरी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.





