सनातनी हिंदुधर्म, संस्कृती आणि विचारांच्या आधाराने भारत देश जगज्जेता ठरेल- ना.राधाकृष्ण विखे पाटील
सनातनी हिंदुधर्म, संस्कृती आणि विचारांच्या आधाराने भारत देश जगज्जेता ठरेल- ना.राधाकृष्ण विखे पाटील
सनातनी हिंदुधर्म, संस्कृती आणि विचारांच्या आधाराने भारत देश जगज्जेता ठरेल- ना.राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी विजय कापसे दि ७ ऑक्टोबर २०२५- विश्वगुरु होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी, विकास प्रक्रीयेच्या बरोबरीने सनातनी हिंदुधर्म, संस्कृती आणि विचारांच्या आधाराने भारत देश जगज्जेता ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तीन दिवसांचे युवा संत चिंतन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये तीनशेहून अधिक प्रतिनिधी या मध्ये सहभागी झाले असून, मंत्री विखे पाटील यांनी या शिबीरात सहभागी होवून प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी स्वामी जितेंद्रनंदजी सरस्वती, केंद्रीय सहमंत्री हरिशंकरजी, पश्चिम महाराष्ट्राचे पालक हेमंत हरहरे, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, केंद्रीय मंत्री अशोक तिवारी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, क्षेत्रीय मंत्री संजय मुद्राळे, स्वामी धर्मप्रकाशजी शास्त्री, सचिन तांबे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, अनादी काळापासून चालत आलेल्या सनातन धर्म संस्कृतीचा विचारच चिरंतन काळ टिकला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनी यासाठी समाजात सातत्याने प्रबोधन करुन, त्याचा संस्कार आणि विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणूकीत आलेला अनुभव पाहाता या देशाला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश बलशाली होत आहे. या देशाकडे विकासाचा अजेंडा आणि संस्कृती परंपरेचा विचार आहे. त्यामुळेच जगातील अनेक देश सध्या चिंताग्रस्त झाले आहेत. म्हणूनच भारत देशात अराजकता माजवून हा देश अस्थिर कसा होईल याचे प्रयत्न सुरु असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या देशाला लाभलेली हजारो वर्षांची संस्कृती आणि परंपरेवर आक्रमन करण्याचे प्रयत्न होत असले तरी, जातीपातीच्या भिंती तोडून आपल्या माध्यमातून होत असलेले धर्मजागरण खुप महत्वपूर्ण आहे. हिंदुधर्म आणि संस्कृती करीता सर्वांना एकत्रित करुन, आपण जी बांधणी करीत आहात, ती खुप महत्वपूर्ण असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत आपण समाजात केलेल्या प्रबोधनामुळेच राज्यात महायुतीचे सरकार येवू शकले. आपल्या आशिर्वादाने मिळालेले हे यश म्हणजे महाराष्ट्राने देशापुढे एक उदाहरण निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
विकसीत भारत देशाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आणि विचारधारा सुध्दा संपूर्ण जगात पोहोचविण्याचे काम केले आहे. योग आणि आयुर्वेदापासून ते आयोध्येतील राम मंदिर, उजैनचे महाकालेश्वर आणि काशि विश्वेश्वराच्या परिसराला अध्यात्मिक कॉरिडॉर बनवून त्यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. देशातील जनतेच्या मनात असलेला श्रध्देचा भाव वसुदैव कुटूंबकम या मंत्राने पुढे घेवून जात असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोसेवा आयोग स्थापन करण्याची संधी मला मिळाली, भविष्यात आता प्रदुषण मुक्त नद्यांसाठी आम्ही काम सुरु केले असून, अगामी कुंभमेळ्यापुर्वी नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी जलसंपदा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.



