राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट; गुणवत्तेमुळे राजहंसचा ब्रँड नावाजलेला – राज्यपाल बागडे

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट; गुणवत्तेमुळे राजहंसचा ब्रँड नावाजलेला – राज्यपाल बागडे
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट; गुणवत्तेमुळे राजहंसचा ब्रँड नावाजलेला – राज्यपाल बागडे

Sangmner vijay kapse दि ४ मे २०२६- दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. दूध उत्पादनामध्ये भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा देश असून महाराष्ट्रात देशामध्ये सहाव्या क्रमांकाने दूध उत्पादन होते. दूध विक्रीला झोनबंदी नसून विश्वास आणि गुणवत्तेमुळे राजहंस हा ब्रँड झाला असल्याचे गौरवउद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे,संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे,विक्रम थोरात, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, बबनराव कुऱ्हाडे, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ.प्रमोद पावसे, सौ. मंदा नवले,कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे म्हणाले की, मी शाळा सोडल्यानंतर दूध व्यवसाय सुरू केला आणि त्या माध्यमातून सुरुवातीला संगमनेरला येण्याचा योग आला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची शिस्त ही सर्वांना दिशादर्शक ठरली. या परिसरात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा समृद्ध सहकार उभा राहिला आहे. दूध व्यवसायात देश जगामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. उत्पादन आणि विक्री आपल्याकडे चांगली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्राचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्याला मोठी समृद्धी मिळाली आहे. राजहंस दूध संघाने विश्वास प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेमुळे आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. दूध विक्रीला झोनबंदी नसल्याने तुम्हाला मोठी संधी आहे.

खाजगीकरणाची स्पर्धा आहे. परंतु सहकार हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी असतो म्हणून सहकार जपला पाहिजे. आज सहकारी दूध संघांमधून पस्तीस टक्के तर खाजगी मधून 65 टक्के दूध संकलन होत आहे. सहकारी संघांमधून होणाऱ्या राज्याच्या संकलनामध्ये राजहंस दूध संघाचाच 65 टक्के वाटा आहे असे सांगताना रणजीतसिंह देशमुख हे शांत स्वभावाचे असून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे आहेत. त्यांनी एमडीएम गोठा, मुरघास याचबरोबर आता नव्याने मिशन 50 लिटर हाती घेतले आहे. दूध क्षेत्रामध्ये निर्माण केलेले हे नवे दालन महाराष्ट्रासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणारे असल्याचे ते म्हणाले.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या दूध संघाची 400 लिटर पासून सुरू झालेली वाटचाल आता 4 लाखापर्यंत येत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या आर्थिक विकासासाठी काम केले आहे. गुणवत्ता आणि उच्च प्रतीचे दूध असल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये मोठी विक्री आहे. सुमारे 550 कोटींची दूध संघाची आर्थिक उलाढाल होत असून चांगल्या दराबरोबर दिवाळीला रिबेटच्या रूपाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली जात असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर हरिभाऊ बागडे यांनी दूध व्यवसायामध्ये मोठे काम केले असून महानंदामध्ये आपल्याला कायम मार्गदर्शन केले असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुजित खिलारे यांनी केले तर व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.
लोकनेते बाळासाहेब थोरात हे चांगले व्यक्तिमत्व
1985 ला बाळासाहेब थोरात आणि मी सोबतच विधानसभेमध्ये गेलो. आमचे विचार वेगळे, मात्र मैत्री कायम राहिली. अत्यंत सरळ, सुस्वाभावी आणि शांत असणारे बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केले. कधीही भेदभाव केला नाही. सततच्या विकास कामांमधून तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये समृद्धी निर्माण केली असल्याचे गौरवउद्गार राज्यपाल डॉ.हरिभाऊ बागडे यांनी काढले.





