ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने खेळाचा ध्यास घेणे गरजेचे-आंतरराष्ट्रीय फुटबॉल शंखवाळकर
एस जी शाळेत ऑलम्पिक दिन जल्लोषात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २५ जुन २०२४ – राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरिल होणाऱ्या क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी भरपुर मेहनत घेत सातत्याने मैदानाचा ध्यास घेतला पाहीजे तरच त्यांचा सर्वांगिण विकास होईल असे प्रतिपादन भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत आयोजित जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना ऑलम्पिक स्पर्धेची माहीती देत खेळाडुंनी आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे असा मौखिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या प्रसंगी टोकिओ ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,क्रीडा शिक्षक अनिल काले,अनिल अमृतकर,दिलीप कुडके,अतुल कोताडे, रघुनाथ लकारे, रेवती तुपकर, कल्पना महानुभाव आदी शिक्षक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक निलेश बडजाते यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले.