एस जी विद्यालय कोपरगाव

एस जी विद्यालयाचे लकारे राज्यस्तरीय राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित

एस जी विद्यालयाचे लकारे राज्यस्तरीय राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित
एस जी विद्यालयाचे लकारे राज्यस्तरीय राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० सप्टेंबर २०२४- सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील  मिलिन्द संस्था केंद्र शिंदे संचालित लोकरंजन कलामंडळ विद्यमाने  यांच्या आयोजित महाराष्ट्र भुषण राजर्षी छत्रपती शाहु महाराज  राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार २०२४ नुकताच कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक  रघुनाथ लकारे यांना माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचे हस्ते तरच संस्थेचे  संस्थापक मिलिंदराव जाधव,अध्यक्ष बाळासाहेब हांडेसर,कार्याध्यक्ष शाहीर देविदास जाधवसर, उपाध्यक्ष आशाताई दोंदे आदी मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आला.

जाहिरात
रघुनाथ लकारे हे जुन ९३-९४ पासुन इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करीत आहे. विविध जिल्हा व तालुकास्तर इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.तसेच इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करताना अनेक विदयार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. विदयालयांत इंग्रजी विषय शिक्षक म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय  आहे.

जाहिरात
सन जुलै २४ पासुन श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक म्हणून ते  कार्यरत आहे. त्यांना हा पुरस्कार  मिळाल्या बद्दल  कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन  चंद्रकांत ठोळे, संदीप अजमेरे,आनंद ठोळे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे, मुख्याध्यापक  रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, दिलीप तुपसैंदर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे