एस जी शाळेचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
शिस्तप्रिय अभ्यासू हुशार हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वाना परिचित
कोपरगाव विजय कापसे दि २१ जुलै २०२४ – तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात कोऱ्हाळकर कुटुंबियांचा नावलौकिक आहे. क्रीडा स्पर्धासह कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन,कामाची आवड असल्याने श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे गुगल अशी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांची ओळख आहे.क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक व विविध खेळ संघटनावरील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास राज्यातून क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे गौरवोद्गार उद्योजक व श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे अध्यक्ष कैलासचंद्र ठोळे यांनी काढले.
जाहिरात
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांच्या सेवापुर्ती सोहळा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई ,उद्योजक कैलास ठोळे ,मनोज अग्रवाल, प्रसाद नाईक, काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,माजी नगराध्यक्ष आर.डी.सोनवणे,विदयार्थी सहाय्यक समितीचे हीरालाल महानुभाव,जेष्ठ विधिज्ञ अॕड.जयंत जोशी,वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर, .सुनिता कोऱ्हाळकर, कुमुदिनी कोऱ्हाळकर,क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे, आनंद ठोळे,मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ठोंबरे आदिच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
जाहिरात
या प्रसंगी उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी बोलताना सांगितले की, एक विश्वासू जबाबदार मुख्याध्यापक व सहायक परीरक्षक म्हणून मकरंद कोऱ्हाळकर यांचे काम कायम स्मरणात राहिल. तालुका गणित विज्ञान प्रदर्शनात त्यांनी झोकून देऊन प्रशासनाला सहकार्य करून काम करत असत त्यांच्या सेवानिवृत्ती मूळे एक पोकळी निर्माण होणार आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी व सेवा न संपणारी असून सतत काम करण्यच्या भावनेमुळे निवृत्तीनंतर ही ते कार्यरत राहतील असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला.
जाहिरात
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी बोलताना सांगितले की, मकरंद कोऱ्हाळकर यांचे शारीरिक शिक्षण क्षेत्रा सह क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांनी तीन वेळा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्षपद कार्य कर्तृत्वातून प्राप्त केले असल्याचे धारूरकर यांनी सांगितले.
या प्रसंगी मकरंद कोऱ्हाळकर यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, आयुष्यात समाजासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून काम करत गेलो.त्यातून विद्यार्थी घडत गेले. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात माजी मुख्याध्यापक कै.आर. जी .कोऱ्हाळकर यांचा एक पॅटर्न आहे तोच राबविण्याचा प्रयत्न मी पण केला.मी जे काम करु शकलो ते श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामुळे करु शकलो, सेवेतून जरी निवृत्त झालो तरी सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील काम यापुढे पूर्णवेळ चालूच ठेवणार असल्याचा विश्वास या प्रसंगी त्यांनी दिला. या प्रसंगी उपस्थित असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक कोऱ्हाळकर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,विविध संघटनांचे पदाधिकारी,कोपरगाव ब्राम्हण सभेचे कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी, मित्र, मंडळी उपस्थित होते.या प्रसंगी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे, डाॕ.अमोल अजमेरे, आनंद ठोळे, राजेश ठोळे आदींनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.अहमदनगर चे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी केले. तर आभार सोहम कोऱ्हाळकर यांनी मानले.