एस.एस.जी.एम महाविद्यालयातील तीन दिवसीय मोडी लिपी कार्यशाळा संपन्न
एस.एस.जी.एम महाविद्यालयातील तीन दिवसीय मोडी लिपी कार्यशाळा संपन्न
एस.एस.जी.एम महाविद्यालयातील तीन दिवसीय मोडी लिपी कार्यशाळा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२४– रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव मध्ये सोमवार दि ४ मार्च ते बुधवार दि ६ मार्च १०१४ या कालावधीत ‘इतिहास विभाग व वसुंधरा भाषा मोडी लिपी संशोधन व संवर्धन केंद्र पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोडी लिपी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेसाठी कोल्हापूर येथील मोडी लिपी प्रशिक्षक व संशोधक माननीय श्री. वसंत ज्ञानदेव सिंघण यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेज प्रदर्शनाने झाली. सदर कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.आर. आर. सानप यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेसाठी विशेष उपस्थिती लाभलेल्या कला विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला भोर यांनी “मराठी भाषेच्या देवनागरी व मोडी या दोन लिपी असून या दोन्ही लिपींनी मराठी भाषा समृद्ध केले आहे”. असे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.आर.सानप यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, “मोडी लिपी ही रोजगाराभिमुख भाषा असून अनेक विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात” असे प्रतिपादन केले.
मोडी लिपी कार्यशाळेची सुरुवात ऐतिहासिक प्रदर्शनाने व प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. किरण पवार यांनी करून दिला. डॉ. भागवत देवकाते यांनी सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुरेश काळे यांनी उद्घाटनाचे व समारोप कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.प्रमोद चव्हाण यांनी मानले. सदर कार्यशाळेत ६३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले .