एकविरामुळे विद्यार्थिनी व महिलांना क्रीडा स्पर्धांसाठी मोठे व्यासपीठ – आ.बाळासाहेब थोरात
2330 विद्यार्थिनी व महिलांच्या सहभागात एकविराच्या क्रीडास्पर्धां जल्लोषात सुरू
संगमनेर विजय कापसे दि ८ मार्च २०२४– महिलांनी विज्ञान,कला,क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकारण, राजकारण, साहित्य यांसह प्रत्येक क्षेत्रात केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्या वतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी समवेत मा. आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात,सौ.पद्माताई थोरात,सौ. सुनंदाताई जोरवेकर, शितल उगलमुगले, एकविराच्या डॉ.प्रा.वृषाली साबळे,सुरभी मोरे, शर्मिला हांडे, तृष्णा औटी, काँग्रेसच्या क्रीडा व युवक सेलच्या समिता गोरे, अहिल्या ओहोळ, प्राजक्ता घुले, पूजा गाडेकर, सुरभी आसोपा, डॉ.विशाखा पाचोरे,किरण गुंजाळ, मयुरी थोरात, अर्चना नवले,शीला पंजाबी,श्रीराम कु-हे,सत्यजित थोरात, पराग थोरात, मिलिंद औटी, अंबादास आडेप,सुनील सांगळे, ॲड सुहास आहेर आदींसह एकवीराच्या विविध महिला उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुमारे 2330 विद्यार्थिनी व महिलांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धांना प्रारंभ झाला. क्रिकेटच्या 30 यार्ड सर्कलवर उभे राहून सर्व खेळाडू महिलांनी यावेळी पाहुण्यांना मानवंदना दिली. अत्यंत उत्साह आणि जल्लोष समय वातावरणात क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचा प्रारंभ झाला.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील पाच वर्षात महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या विविध स्पर्धा आयोजनात यावर्षी ही भव्य महिला क्रिकेटचा थरार संगमनेर मध्ये होणार आहे.तालुक्यातील 71 संघांचा सहभाग हा आनंददायी आहे.
महिलांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश आणि केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून क्रिकेटमध्ये ही मुलींना मोठी संधी आहे.या क्षेत्रामध्ये आता नव्याने करिअरच्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत. एकविरा फाउंडेशनने सुरू केलेल्या या स्पर्धेचा ग्रामीण भागातील मुलींना नक्कीच लाभ होणार असून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोबाईल पेक्षा मैदानाकडे वळले पाहिजे. मैदानी खेळ हे आरोग्यासाठी चांगले असून क्रिकेट मधून सांघिक भावनेसह अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. अत्यंत जल्लोषाने मोठ्या उत्साहाने या स्पर्धेचा आनंद घ्या अशा शुभेच्छा ही त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनीना दिल्या.
मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, महिला सक्षमीकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धांमधूनही मुलींनी सहभाग घेऊन स्वतःला सशक्त बनवा असे आवाहन केले.
सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सांस्कृतिक व वैभवशाली शहर म्हणून राज्यात ओळखले जात आहे. एकविराच्या महिलांच्या क्रिकेट सामन्यांमधून महिला व विद्यार्थिनींनी घेतलेला मोठा उत्स्फूर्त सहभाग हा अत्यंत आनंददायी आहे .ही स्पर्धा राज्यभरातील मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी एकविरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देताना या स्पर्धेमध्ये क्रिकेट, रस्सीखेच स्पर्धेबरोबरच महिलांची आरोग्य तपासणी व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली साबळे यांनी केले तर डॉ.विशाखा पाचोरे यांनी आभार मानले.यावेळी महिला पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू विद्यार्थिनी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व स्पर्धांसाठी महिलानी मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे
क्रिकेटमध्ये 71 संघांचा सहभागअहमदनगर जिल्ह्यात प्रथमच महिला क्रिकेटच्या स्पर्धा होत असून संगमनेर तालुक्यातील विविध गाव व विद्यालयांमधील 71 क्रिकेट संघ तर रस्सीखेचसाठी 65 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धा चार दिवस सुरू राहणार असून सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे या सर्व संघांना कॅप व कीट देण्यात आली असून अत्यंत अत्याधुनिक सुविधा, प्रेक्षकांसाठी गॅलरी, हिरवे मैदान यामुळे ही स्पर्धा रंगतदार ठरणार असून षटकारा चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजराने मैदान दुमदुमून जात आहे.