विविध कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून कोपरगावात शिवजयंती होणार साजरी
विविध कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून कोपरगावात शिवजयंती होणार साजरी
जय जय महाराष्ट्र गीताने शिवजयंती उत्सव बैठक संपन्न राज्य आणि परराज्यातून विविध कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून कोपरगावात शिवजयंती होणार साजरी
कोपरगाव विजय कापसे दि ८ मार्च २०२४–कोपरगाव शहरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या वतीने साजरी करण्यात येणार असून २६ आणि २७ तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात कोपरगाव येथे शिवसेनेच्या वतीने राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली होती. नुकतेच जय जय महाराष्ट्र या गीताला शासनाच्या वतिने राज्य गिताची मान्यता देखील मिळालेली आहे त्यामुळे या गीताने सदर बैठकीला सुरुवात करत २०२४ शिवजन्म उत्सव समिती यावेळी जाहीर करण्यात आली.
या उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल कालु आव्हाड तर कार्याध्यक्ष प्रफुल्ल शिंगाडे, उपाध्यक्ष विकास शर्मा, बाळासाहेब साळुंखे,गगन हडा खजिनदार कलविंदर दडियाल, रवि कथले त्याचबरोबर शिवज्योत आणण्यासाठी नवश्या गणपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवज्योत आणली जाणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख सपनाताई मोरे ,वर्षाताई शिंगाडे अश्विनीताई होणे, राखीताई विसपुते महिला आघाडी तर मिरवणूक प्रमुख म्हणून सुनील कुंढारे ,दादा शेवाळे विक्रांत झावरे सतीश शिंगाने ,विकी मोरे , अभिषेक प्रमुख दिलीप आरगडे, अक्षय नन्नवरे अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी राजेंद्र झावरे, संजय सातभाई कैलास जाधव, सनी वाघ, शिवाजी ठाकरे, योगेश बागुल, मनोज कपोते, शिवनारायण परदेशी, भरत मोरे, रंजन जाधव, पप्पू पडियार,राहुल शिंदे, संजय दंडवते, बाळासाहेब राऊत, सोनवणे मामा, कुक्कु शेठ सहानी, बालाजी गोर्डे ,सनी काळे, नाना जाधव, सिद्धार्थ शेळके, नितेश बोरुडे, आशिष निकुंभ, दीपक कराळे, किरण गायकवाड, श्रीकांत बागल, महेश गायकवाड, ऋषी निकम ,सागर पंडोरे, सोनू आव्हाड, शेखर बोरवके, राजू धरणे, सिद्धार्थ वाघ, इरफान शेख ,राहुल देशपांडे ,विशाल झावरे, शेखर कपोते, योगेश उशीर, दिनेश भालेराव, मधुकर पवार, अशोक पवार,प्रवीण शेलार, मंगेश देशमुख, अरुण बोराडे, बंटी बाविस्कर, किरण अडांगळे, राकेश वाघ, वसीम शेख, बबलू जाधव ,सागर परदेशी, आदित्य ठोंबरे, विजय सोनवणे, गणेश जाधव, अभिवादक किरण खर्डे, अविनाश धोकट, गणेश थोरात, सनी खैरे, विनय भाकरे ,भूषण वडांगळे ,संदीप दळवी, विक्रांत झावरे,अक्षय नन्नावरे, अक्षय वाघचौरे, रोशन पवार, श्रीकांत काळे, आशिष बोर्डे, संतोष पवार, संतोष जावरे, दिलीप सोनवणे, कुणाल आमले,निखिल जोशी, सिद्धार्थ वाघ,निखील जोशी आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 26 आणि 27 या दोन दिवसात कोपरगाव शहरात राज्यातील आणि परराज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असून दिनांक 28 मार्च 2024 रोजी भव्य दिव्य अशी मोठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी शिवसैनिकांनी सहभाग नोंदवा असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे