ब्रिटीश कालीन जोखडातून मुख्यालयी राहण्याच्या बंधनातून जि.प. शिक्षकांना मुक्त करा : माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे
ब्रिटीश कालीन जोखडातून मुख्यालयी राहण्याच्या बंधनातून जि.प. शिक्षकांना मुक्त करा : माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे
कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४– जिल्हा परिषद प्राथ. शिक्षकांना मुख्यालयी राहानेबाबतचे ब्रिटीश कालीन धोरण शासनाने तत्काल बंद करावे. व शिक्षकांना जोखडातून मुक्त करावे अशी आग्रही मागणी शिडीं लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मा. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडेस लेखी पत्राद्वारे केलेली आहे.
श्री. वाकचौरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले कि, ब्रिटीश काळात त्या वेळेच्या सोई- सुविधा, दळण वळण याचे दृष्टीने ग्रामस्तरावरील शिक्षक, शासकीय कर्मचारी यांनी जेथे नोकरी तेथे वास्तव्य असे धोरण अवलंबिले होते. त्यास आपला देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्ष पूर्ण होऊनही ब्रिटीश यांनी त्यांचे सोयीनुसार, व फायद्यासाठी तयार केलेले नियमातून ग्रामस्तरावरील कर्मचारी मुक्त होऊ नये. याचे नवल वाटते. आजआपल्या देशातील खेडो-पाडी हि दळण वळण, संपर्क, वाहन सुविधा, मोबाइल क्रांतीमुळे क्षणात कुठेही संपर्क करू शकतो .मग शिक्षकाने मुख्यालयी राहिले पाहिजे हा आग्रह कशासाठी ? शिक्षक हा जर त्याचे काम शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत जर करीत असेल तर मुख्यालही राहिलेच पाहिजे हि सक्ती कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून आज कौटुंबिक रचना पाहिलीकी शिक्षक वा कर्मचारी यांचे वृद्ध आई – वडील किवा घरातील वृद्धांची वैद्यकीय, कौटुंबिक देख भाल करणेसाठी कोणीही नसते त्या मुले शिक्षक हा तणावाखाली काम करीत असतो, त्यातच मुख्यालयीच्या अटीमुळे स्थानिक राजकीय वातावरण, माहितीचा अधिकार त्यातून होणारा आर्थिक, मानसिक छळ याला सामोरे जावे लागते. हे नाकारून चालणार नाही.
मी स्वतः ग्राम विकास विभागात शिक्षक, गट विकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, व देशातील नंबर २ चे देवस्थान असणार्या शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज केलेले आहे. आपल्याकडे असणार्या उपलब्ध सुविधा, संपर्क यंत्रणा. दळणवळण याच्या सुविधा पाहता जि.प. प्राथ. शिक्षक हा त्याचे नेमणुकीचे ठिकाणी वेळेत , मोजून अर्धा तासाचे आत पोहोचू शकतो. ही वस्तुस्थिती असताना शासनाने ब्रिटीश कालीन असणारा मुख्यालायी राहण्याचा नियम तत्काल प्रभावाने निष्कासित करावा. व ग्रामस्तरावरील जि.प.प्राथ. शिक्षकांना मुख्यालयी राहाणेचे ब्रिटीश कालीन धोरणाच्या जोखडातून तत्काल मुक्त करावे अशी आग्रही विनंती केलेली आहे.