संगमनेर

मातीत रमणाऱ्या रुक्मिणी घुलेवाडीच्या संघाने पटकावला एकविरा चषक

मातीत रमणाऱ्या रुक्मिणी घुलेवाडीच्या संघाने पटकावला एकविरा चषक

4710 महिलांच्या सहभागात 4 दिवस मोठ्या आनंदात क्रीडा महोत्सव संपन्न; रस्सीखेच मध्ये ग्रामीण महिलांचा दबदबा
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १२ मार्च २०२४काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकविरा फाउंडेशनने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवात 4710 महिलांनी सहभाग नोंदवून चार दिवसाचा हा क्रीडा महोत्सव संस्मरणीय ठरविला.खुल्या गटात शेतीमातीत कष्ट करणाऱ्या घुलेवाडीच्या रुक्मिणी संघाने आत्मा अकोले या संघावर मात करून एकविरा चषक पटकावला.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने मागील चार दिवसापासून महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण 4710 महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात, टाटा हॉस्पिटलचे डॉ हसमुख जैन, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, सौ रचनाताई मालपाणी, उत्कर्षाताई रुपवते , सौ सुनंदाताई जोरवेकर, सौ सुनंदा दिघे, प्रा डॉ वृषाली साबळे, सुरभी मोरे ,प्राजक्ता घुले, विशाखा पाचोरे ,शर्मिला हांडे, स्वामिनी वाघ ,अहिल्या ओहोळ, सुरभी असोपा, तृष्णा आवटी, शीला पंजाबी, ॲड .सुहास आहेर, श्रीराम कु-हे, अंबादास आडेप,सत्यजित थोरात, मिलिंद आवटी यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना सौ.कांचनताई थोरात म्हणाल्या की,एकविरा फाउंडेशन च्या वतीने सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील प्रत्येक गावातील महिलेने सहभाग घेतला. चार दिवस अत्यंत आनंदाने सर्वजणी सहभागी झाल्या .एकमेकींच्या ओळखी झाल्या .नवीन मैत्रिणी झाल्या. मागील आठ दिवस अगोदर गावागावात प्रॅक्टिस केल्या गेल्या हे आनंदाचे वातावरण यापुढेही कायम राहील यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम करा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा आपला परिवार आहे.प्रत्येक कुटुंबाच्या आणि तालुक्याच्या प्रगतीत महिलांचे मोठे योगदान असून त्यांचा सन्मान व्हावा त्यांना कला व क्रीडा व्यासपीठ मिळावे म्हणून सुरू झालेला या स्पर्धा राज्य पातळीवर पोहोचल्या आहेत .यामध्ये सर्वांनी अत्यंत आनंदाने सहभाग घेतला .आणि मागील चार पाच वर्षाची मुलगी ते 65 वर्षांची आजी यांनी सहभाग नोंदवून  क्रीडा संकुलातील वातावरण जल्लोषमय केले. सर्वांच्या सहभागाने या स्पर्धा यशस्वी ठरले असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी सौ.रचना मालपाणी यांनीही शुभेच्छा दिल्या.

महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटातून शेतीमातीत रामणाऱ्या रुक्मिणी घुलेवाडी या संघाने  आत्मा अकोले संघावर 22 धावांनी मात केली. त्यांना एकविरा चषक व  7777 रुपये देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय संघाला चषकासह 5555 रु. पारितोषिक देण्यात आले. जिजाऊ ब्रिगेड ने तृतीय क्रमांक पटकावला तर महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम बक्षीस बीएसटी कॉलेज संगमनेर ने पटकावले तर द्वितीय बक्षीस अमृतवाहिनी पॉलिटेक्निक आणि तृतीय बक्षीस फार्मसी कॉलेजने पटकावले. लहान गटामध्ये प्रथम बक्षीस रविशंकर विद्यालयाने पटकावले द्वितीय बक्षीस अमृतवाहिनी इंटरनॅशनल तर तृतीय बक्षीस दिगंबर सराफ विद्यालयाने मिळवले.

रस्सीखेच मध्ये खुल्या गटात प्रथम बक्षीस स्वराज निमगाव-भोजपुर व सावित्रीच्या लेखी संगमनेर यांनी संयुक्त मिळवले तर तृतीय बक्षीस वडगाव पान वाघिणी संघाने मिळवले. महाविद्यालयीन गटात प्रथम बक्षीस सह्याद्री ज्युनिअर कॉलेजने द्वितीय बक्षीस संगमनेर ज्युनिअर कॉलेजला आणि तृतीय बक्षीस पोहरा ज्युनिअर कॉलेजने मिळवले. तर लहान गटामध्ये प्रथम बक्षीस शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडी द्वितीय बक्षीस सरदार थोरात विद्यालय पानोडी आणि तृतीय बक्षीस अंबिका माता ग्रुप निमगाव भोजपूर यांनी मिळवले.

प्रथम आलेल्या सर्वांना 7777 द्वितीय आलेल्या सर्वांना 5555 व तृतीय आलेल्या सर्वांना 3333 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात याचबरोबर अनेक वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरभी मोरे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ.वृषाली साबळे यांनी केले तर तृष्णा आवटी यांनी आभार मानले.यावेळी खेळाडूंसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

चार दिवस स्टेडियमवर जल्लोषमय वातावरण

महिला दिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धेत  दिवसेंदिवस खेळाडू महिलांची संख्या वाढत गेली. याचबरोबर प्रेक्षक महिलांची संख्याही वाढत गेली. गावोगावातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. प्रत्येक सामन्यादरम्यान डीजेवर अनेक महिला भगिनींनी ताल धरला. तर फटाक्यांच्या आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दुमदुमून जात होता.

आतिषबाजीने पारितोषिक वितरण सोहळा संस्मरणीय

क्रिकेट व रस्सीखेच मधील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्याबरोबर यावेळी झालेली फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर डीजे चा ताल आणि मान्यवरांची उपस्थिती. आकर्षक विद्युत रोषणाईत झालेला हा पारितोषिक वितरण सोहळा संस्मरणीय ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे