पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी माध्यम – संतोष कोलते
पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी माध्यम – संतोष कोलते
पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी माध्यम – संतोष कोलते
कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं माध्यम आहे. त्याचा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांचे हित जोपासणारी आपल्या पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कोलते यांनी केले.
अहमदनगर जिल्हा (शिर्डी लोकसभा) राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचा ‘प्रशिक्षण मेळावा’ नुकताच कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी प्रिंट मीडिया त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जनसामान्यांवर प्रभाव होता मात्र आता सर्वत्र सोशल मीडियाचा बोलबाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपुढे मांडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानी सक्रिय होवून सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन करून उपस्थित सोशल मीडिया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडिया वापरा बाबत विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले.यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा एकमुखी निर्धार कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सोशल मेडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, विभागीय सचिव सुनील गाडे, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र औताडे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष महेंद्र वक्ते आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.