मंजुर विहिरी असून श्रेयवादात अडकल्या धोंडेवाडी ग्रामस्थांचा भावनांचा उद्रेक
मंजुर विहिरी असून श्रेयवादात अडकल्या धोंडेवाडी ग्रामस्थांचा भावनांचा उद्रेक
कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२४– धोंडेवाडी गावातील सरपंच डॉ.राजेंद्र नेहे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून गावासाठी अनेक विहिरीचे प्रस्ताव मंजूर केले, मात्र पंचायत समितीचा आवक-जावक कर्मचारी नसल्याचे कारण सांगून केवळ आमदार काळे यांना फोटोसेशन करावयाचे असल्याकारणाने श्रेयवादात विहीर अडकून पडल्या आहेत, त्यामुळे मंजूर विहिरीचे प्रकरणे मिळाले नाही म्हणून धोंडेवाडी ग्रामस्थ व इतरही गावाच्या ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.सदर प्रकरणे करणेसाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या प्रयत्नाने केवळ ग्रामसभेचा ठराव करून प्रक्रिया केली जाते यात आमदारांचा कवडीचाही संबंध नसतो तरीही त्यात श्रेय मिळण्यासाठी सुरू असलेली नागरिकांची गळचेपी ही निंदनीय आहे.
धोंडेवाडी हे गाव तसे दुष्काळी आहे. ही ग्रामपंचायत कोल्हे गटाकडे असून युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा विकास होत आहे. याच माध्यमातून धोंडेवाडीचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी गावचे सरपंच डॉ.राजेंद्र नेहे यांनी अनेक विहिरीचे प्रस्ताव महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केले. विवेकभैय्या कोल्हे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली ग्राम प्रशासनाने शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतल्या होत्या. ही प्रकरणे मंजूर होऊन ही कार्यरंभ आदेश कोपरगाव पंचायत समितीमध्ये तयार होऊन पडल्या आहेत. मात्र केवळ आमदार फोटो काढायचा आहे त्यासाठी आवक जावक कर्मचारी नसल्याचे सांगून पंचायत समिती दिरंगाई जाणून बुजून करीत आहे. यामागे आमदारांना हा कार्यक्रम घ्यावयाचा आहे. त्यामुळे ते मंजूर आदेश दिले जात नाही. आमदारांना त्या कामाचे श्रेय घेऊन फोटोसेशन करावयाची हौस भारी आहे. मात्र अडकलेल्या ह्या विहिरीचे काम केवळ अट्टहासपायी उशीर होणार आहे, यास प्रशासन ही तितकेच जबावदार असणार आहे. पुढे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्यास हे काम लांबणीवर पडणार आहे. केवळ श्रेयवादात जनतेचे नुकसान होऊ नये, ही माफक अपेक्षा धोंडेवाडी व इतर गावातील ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.
पंचायत समितीने लवकरच कार्यरंभ आदेश लाभधारकांना द्याव्यात, अन्यथा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त लाभार्थी व ग्रामस्थ जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
केवळ प्रसिद्धीसाठी आणि श्रेय घेण्यासाठी अनेकांची हक्काची मंजूर योजना गतिमान होऊ नये, यासाठी योजना मंजुरी होणार हे पाहून प्रशासनाच्या कागदी घोड्यात आमचे नुकसान करू नये अशी भावना लोकप्रतिनिधी बद्दल नागरिक1 व्यक्त करू लागले आहे.