सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाबरोबरच परिसर स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जोड-बिपीनदादा कोल्हे.
सभासद शेतक-यांच्या उत्कर्षाबरोबरच परिसर स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जोड-बिपीनदादा कोल्हे.
कोपरगांव विजय कापसे दि २ नोव्हेंबर २०२४– माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यात संघर्ष करत नियमांचे सतत पालन केले, जेथे प्रशासकीय शिस्त, नियम, आदर आणि काटकसर तेथे लक्ष्मीचा नेहमीच वास असतो, त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेवुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगतीकडे झेप सुरू आहे, सभासद, शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांच्या उत्कर्षात आपल्या परिसरातल्या आर्थीक स्थैर्यतेला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची जोड असल्याचे प्रतिपादन श्री.बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सालाबादप्रमाणे याही वर्षी दिपावली पर्वावर शुक्रवारी लक्ष्मीपुजन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अभ्यासु नेतृत्व श्री. विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते सभासदांना मार्गदर्शन करतांना अध्यक्षपदावरून बोलत होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. मनेष गाडे व सर्व विद्यमान संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. एक्साईज पोलिस दलात राहुल मच्छिंद्र राहणे यांची निवड झाल्याबददल तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. मनेष गाडे यांचा वाढदिवसानिमीत्त श्री.बिपीनदादा कोल्हे, श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी सत्कार केला.
प्रारंभी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकांत सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीची घौडदौड सांगत सीएनजी प्रकल्प अंतीम टप्प्यात असल्याचे सांगुन चालु गळीत हंगामात कारखान्यांने ७ लाख मे. टन उस गाळपाचे उददीष्ट ठेवले असुन सर्व उपप्रकल्प जोमाने चालविण्यासाठी त्याची सर्व पुर्वतयारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे साहेब व व कारखान्याचे चेअरमन श्री .विवेकभैय्या कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९६० च्या दशकापासुन या भागात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमांतुन अव्यहतपणे आर्थीक स्थैर्यतेसाठी लक्ष्मीची पुजा करत कायम प्रगतीचा ध्यास घेत देशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला अग्रभागी नेले, यात त्यांचा सिंहाचा वाटा असुन त्यांच्याच पावलांवर पाउल ठेवुन आपल्या सर्वांचे मार्गक्रमण सुरू आहे. श्रीलक्ष्मी स्थिर झाली तरच त्यातुन सर्वांच्याच जीवनाचा उत्कर्ष होतो, आर्थीक घडी विस्कटु द्यायची नाही हा स्व. कोल्हेसाहेबांचा ध्यास होता. पुढचा येणारा सर्व काळ स्पर्धेचा आहे त्यात संजीवनी उद्योग समूह भक्कमपणे टिकुन राहिल हा आत्मविश्वास आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करणारा आपला कारखाना देशात पहिला सहकारी कारखाना आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने पुढच्या पाच वर्षात कमी होवुन इलेक्ट्रीकवर चालणांरी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणांत धावणार आहेत आणि त्यासाठी पूर्व तयारी म्हणून संजीवनी पेट्रोल पंपाच्या कार्यस्थळावर इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. सतत धाडसी निर्णय घेऊन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने देशातील साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम केले आहे व हे काम आता नव्याने कारखान्याचे चेअरमन श्री.विवेकभैय्या कोल्हे करीत आहेत. सतत नवीन बदलांचा अभ्यास करत पावले टाकली जात आहेत. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, आजी माजी संचालक मंडळ, कारखाना व्यवस्थापन यांच्या साथीने, नव्यां जोमांने ही भरारी वेगाने पुढे घेवुन जाउ असा आत्मविश्वास श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. दत्तात्रय कोल्हे, कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, शिवाजीराव वक्ते, संजय होन, आप्पासाहेब दवंगे, सोपानराव पानगव्हाणे, मोहनराव वाबळे, शिवाजीराव कदम, पांडुरंगशास्त्री शिंदे, बाळासाहेब शेटे, डॉ. गुलाबराव वरकड, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, उषाताई संजय औताडे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, रमेश घोडेराव, मच्छिंद्र लोणारी, कैलास संवत्सरकर, माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक, विजय आढाव, जयराम गडाख, प्रदिप नवले, राजेंद्र बागुल, बाळासाहेब पानगव्हाणे, कामगार नेते मनोहर शिंदे, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, विष्णुपंत क्षीरसागर, कैलास माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहेर, जनरल मॅनेजर (शुगर) शिवाजीराव दिवटे, अॅडमिनीस्ट्रेटिव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, योगेश इंगळे, प्रदिप गुरव, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, रासायनिक विभागाचे टी. व्ही. देवकर, चीफ अकौंटंट एस. एन. पवार, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, सभासद उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते,
शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. कारखान्याचे कॅशियर डी. डी. बोरनारे, व आर. टी. गवारे यांना बक्षिस देवुन त्यांचा सत्कार करण्यांत आला. सुत्रसंचलन सेक्रेटरी टी. आर. कानवडे यांनी केले.