या आदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे २४ तासाच्या आत पेमेंट का दिले गेले नाही?-भरत बोरणारे
या आदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे २४ तासाच्या आत पेमेंट का दिले गेले नाही?-भरत बोरणारे
माजी संचालक भरत बोरणारे यांचा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनावर आरोप करत चौकशीसह कारवाई ची मागणी
कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२४- नुकतेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना शेतमाल विकताच तात्काळ रोख पेमेंट देण्याची सुविधा उपलब्ध केली असून नक्कीच ही कौतुकास्पद बाब असली तरी या अगोदर प्रशासक काळात व सध्याच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात ही पद्धत का अवलंबवली नाही? असा प्रश्न कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरत किसनराव बोरणारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरत बोरणारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शासन नियमानुसार शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेला शेतमालाचे तातडीने पेमेंट रोख देण्यात यावे असा आदेश आहेत, परंतु गेल्या वर्षी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकराज असताना तसेच गेल्या वर्षापासून नवनिर्वाचित संचालक मंडळ कारभार पाहत असताना कोणत्याही शेतकऱ्याला रोख स्वरूपात शेतमालाचे पैसे देण्यात आले नाही त्यामुळे आत्ताच अचानकपणे शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट देण्याचे कार्यालय सुरू कसे केले?
असा प्रश्न बोरणारे यांनी उपस्थित करत मागील प्रशासक काळात तसेच गेल्या वर्षापासून संचालक मंडळ पाहत असलेल्या कारभाराच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना शेतमाल विकल्यानंतर रोख पैसे का देण्यात आले नाही या बाबीची प्रशासनाने सखोल चौकशी करत संबंधित प्रशासक,सचिव व गेल्या वर्षापासून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पाहणाऱ्या संचालक मंडळावर तसेच आता यासंबंधी वाढीव टेंडर देखील काढलेले आहे त्यामुळे या संबंधी सर्व प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या वर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरत बोरणारे यांनी केले आहे.