शहर पोलीसांनी तीन गावठी हातभट्टीवर छापा टाकत सव्वा दोन लाखाचे दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार गावठी दारुचा केला नाश
शहर पोलीसांनी तीन गावठी हातभट्टीवर छापा टाकत सव्वा दोन लाखाचे दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार गावठी दारुचा केला नाश
कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२४– कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार संवत्सर शिवारात नारंदि नदीच्या कडेला काटवनात एक इसम हा गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सपोनि मयुर भांबरे, पोसई रोहीदास ठोंबरे, पोकों गणेश काकडे, पोकों श्रीकांत कुऱ्हाडे आदी पोलिस पथकाने बातमीतील संवत्सर शिवारात नारंदि नदीच्या कडेला छापा टाकुन मंदाचाई बळीराम आहेर रा. मनाईवस्ती यांच्याकडे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन ९५ हजार रुपये किंमतीचे ९५० लिटर कच्चे रसायन व २ हजार रुपये किंमतीचे २० लिटर गावटी हातभट्टीची तयार दारु मिळुन आली आसता पोलिसांनी त्यातून पंचासमक्ष सॅम्पल काढून बाकी साहित्याचा जागेवर नाश करण्यात आला असून पोकॉ श्रीकांत कुन्हाडे यांचे फिर्यादीवरुन सदर महिलाविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरजि न १२१/२०२४ महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (फ) (ड)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या कारवाईत संवत्सर शिवारात गोदावरी नदीच्या कडेला काटवनात साहेबराव नाना सोनवणे रा. मनाईवस्ती, संवत्सर हा गावठीहातभट्टीची दारु तयार करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता त्याचेकडे ३० हजार रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन मिळून आले असता सदर ठिकाणी पंचनामा करत ते पंचासमक्ष जागीच नाश करण्यात आले असून सदर इसमा विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरमि.न १२२/२०२४ महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अशा प्रकारे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवार दिनांक १४ मार्च रोजी संवत्सर शिवारात व जेउर पटोदा शिवारात काटवनात गावटी हातभट्टी दारु तयार करीत असलेल्या ३ ठिकाणी छापा टाकुन कारवाई करत २ लाख २९ हजार रुपयेची गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारु जागीच नाश केली असून सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी शिरिष वमने शिडीं विभाग शिडी यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक प्रदिप देशमुख, स.पोनि. विश्वास पावरा, सपोनि मयुर भांबरे, पोसई रोहीदास ठोंबरे पोकॉ गणेश काकडे, पोकॉ श्रीकांत कुन्हाडे आदी शहर पोलिस पथकाने केली आहे.