सोमैया वरिष्ठ व रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयचा सोमवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
सोमैया वरिष्ठ व रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयचा सोमवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
सोमैया वरिष्ठ व रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयचा सोमवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
कोपरगाव विजय कापसे दि १६ मार्च २०२४– कोपरगाव येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी स. १०. ०० वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे . अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
यावर्षीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व ज्येष्ठ समाजसुधारक प्रभाकर झळके यांच्या शुभहस्ते व संदीप कोळी (पोलीस निरीक्षक, कोपरगाव) तसेच सुहास जगताप साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी, कोपरगाव नगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत व अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या समारंभात विविध क्षेत्र क्षेत्रात आपल्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हिंदी अकादमीचा राज्य पुरस्कार प्राप्त झालेले प्रो. डॉ. जिभाऊ मोरे तसेच वाणिज्य शाखेतील उत्कृष्ट प्राध्यापक प्राध्यापक म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झालेले डॉ. रवींद्र जाधव व इतर मान्यवर प्राध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी कोपरगावातील मान्यवर रसिक नागरिक तसेच पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वार्षिक पारितोषिक समारंभाचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे यांनी केले आहे.
याप्रसंगी संदीप रोहमारे विश्वस्त कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी तसेच सचिव एडवोकेट संजीव कुलकर्णी संस्थेच्या इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.