मेधाच्या चित्त थरारक म्युझिकल स्पोर्ट मध्ये ७२२ विद्यार्थ्यांचा सहभाग; म्युझिकल स्पोर्ट संकल्पना अमृतवाहिनीत राज्यात प्रथम
अमृतवाहिनी मधून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होतील – हॉकीपटू युवराज वाल्मिकी
संगमनेर विजय कापसे दि १७ मार्च २०२४– मा.शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव हा राज्याचा मानबिंदू ठरला आहे .यामध्ये म्युझिकल स्पोर्ट ही अभिनव संकल्पना अमृतवाहिनीने मेधा महोत्सवात राज्यात प्रथम राबवली असून विविध चित्त थरारक खेळांमध्ये संस्थेमधील 7200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून हा महोत्सव व म्युझिकल स्पोर्ट संस्मरणीय ठरविले.
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य मैदानावर मेधा महोत्सवा अंतर्गत म्युझिकल स्पोर्ट संपन्न झाले यावेळी भारतीय राष्ट्रीय हॉकी संघातील हॉकीपटू युवराज वाल्मिकी, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व्ही.बी.धुमाळ, डॉ एम ए वेंकटेश, डॉ जे बी गुरव, डॉ मच्छिंद्र चव्हाण ,डॉ मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ संजय मंडकमाले, अंजली कन्नवर, सौ जे.बी सेठी, शितल गायकवाड, विलास भाटे, नामदेव गायकवाड, मेधा समन्वयक प्रा जी.बी. काळे, डॉ विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे, आदींसह सर्व विभाग प्रमुख क्रीडाशिक्षक शिक्षक व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्युझिकल स्पोर्ट मध्ये सर्वप्रथम सातशे विद्यार्थ्यांनी युवराज वाल्मिकी यांना परेड मधून मानवंदना दिली. त्यानंतर इलेस्टिक गर्ल रुणझुन फटांगरे हिने 70 फूट उंचीवरून सादर केलेले योगाचे प्रात्यक्षिक अंगावर शहारे आणणारे ठरले. 100 मीटर 200 मीटर व 400 मीटर रनिंग मध्ये 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
तरी यानंतर म्युझिकल स्पोर्ट मध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व इंटरनॅशनल स्कूलच्या अकराशे विद्यार्थ्यांनी हॉकी खेळाच्या थीमवर डान्स सादर केला. यानंतर एमबीएच्या 300 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 2011 चा जिंकलेला वर्ल्ड कप आणि महेंद्रसिंग धोनी याची कारकीर्द यावर पंधरा मिनिटांमध्ये अंगावर थरारक शहारे अंताने केलेले नृत्य संस्कृतीय ठरले.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 600 विद्यार्थ्यांनी सादर केलेले फुटबॉलचे प्रात्यक्षिक तर काळजाचा ठोका चुकवणारे होते. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले मेधा 2024 आणि त्यावर सादर केलेले नृत्य. याचबरोबर ज्युनिअर कॉलेज बी फार्मसी डी फार्मसी यांनी बास्केटबॉल हॉलीबॉल यावरील नृत्याने संपूर्ण मैदानावर टाळ्यांचा गजर केला. म्युझिकल स्पोर्ट ही आलो की थीम राबवताना यामध्ये अमृतवाहिनीतील सात हजार दोनशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नयनरम्य सोहळा यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम दिमाखदार झाला.
यावेळी बोलताना हॉकीपटू युवराज वाल्मिकी म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना स्पोर्टच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत इतके चांगले दर्जेदार खेळाडू या ठिकाणी असून आगामी काळात अमृतवाहिनीतील अनेक खेळाडू विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर झालेली आकर्षक आतिषबाजी, विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य यामुळे यावर्षीचा मेधा हा सांस्कृतिक आणि क्रीडा कलागुणांना वाव देणारा ठरला.
दिवसातून एकदा तरी खळखळून हसा – दीपक देशपांडेजीवन हे एकदाच मिळते.नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी हास्य ही देवाने दिलेली अनमोल देणगी आहे. हसण्यामध्ये कोणीही चिकटपणा करू नका. दिवसातून एकदा तरी खळखळून हसा. आणि निरोगी रहा. असा सल्ला विद्यार्थ्यांची संवाद या कार्यक्रमात हास्य सम्राट प्रा.दीपक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिला असून त्यांनी सादर केलेल्या विविध मिमिक्री व कार्यक्रमातून एक तास सर्व विद्यार्थ्यांना खळखळून हसवले.