शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी होन, उपजिल्हाध्यक्षपदी शिंदे , तालुकाध्यक्षपदी जावळे व शिंदे यांची निवड
शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी होन, उपजिल्हाध्यक्षपदी शिंदे , तालुकाध्यक्षपदी जावळे व शिंदे यांची निवड
लांडगे जिल्हा समन्वयक ,शरद गवळी तालुका समन्वयक तर हरिभाऊ शिलेदार संघटक
कोपरगाव विजय कापसे दि १७ मार्च २०२४– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काल शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
खा. सदाशिवराव लोखंडे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांना निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षासाठी केलेल्या कामाची माहिती पाठवली होती. या सर्व कामाची दखल घेत चांदेकसारे येथील भगीरथ होन यांची शेतकरी सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर परसराम शिंदे यांची उपजिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. जिल्हा समन्वयक पदी निलेश लांडगे यांची निवड झाली. शेतकरी सेनेच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी सोनेवाडीचे सिताराम जावळे यांची व नवनाथ शिंदे यांची निवड झाली. हरिभाऊ शिंदे यांची तालुका संघटक तर शरद गवळी यांची तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली. पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेची शेतकरी सेना कार्यान्वीत केली आहे यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात मोठी मदत होणार आहे.
निवडीचे पत्र काल धनंजय जाधव यांच्या सहीने वरील पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.गेल्या महिन्यात वरील पदाधिकाऱ्यांनीउबाठा सेनेला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारावर प्रभावित होऊन खासदार सदाशिव लोखंडे व नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत काम करण्यासाठी प्रवेश केला होता.वरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत नितीनराव औताडे यांनी त्यांचे अभिनंदन करतांना सांगितले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा हिंदुत्वाचा विचार व शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार करून मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी शहर व ग्रामीण भागात काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल शिवसेना शहर व तालुका युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे आभार मानले आहे.