अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांचे चित्रथरारक क्रीडा प्रात्यक्षिक
अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळतील – हॉकीपटू युवराज वाल्मिकी
संगमनेर विजय कापसे दि १९ मार्च २०२४– माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा अमृतवाहिनीचा मेधा महोत्सवात अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूल मधील ३०० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सादर केलेले चित्त थरारक क्रीडा प्रात्यक्षिक हे म्युझिकल स्पोर्ट मधील लक्षवेधी ठरले असून अद्यावत सुविधा व अत्याधुनिक शिक्षण प्रणाली यामुळे या निडो इंटरनॅशनल स्कूल मधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खेळतील असा विश्वास भारतीय हॉकी संघातील हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांनी व्यक्त केला आहे.
अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य मैदानावर मेधा महोत्सवा अंतर्गत म्युझिकल स्पोर्ट संपन्न झाले .यावेळी भारतीय राष्ट्रीय हॉकी संघातील हॉकीपटू युवराज वाल्मिकी, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य व्ही.बी.धुमाळ, डॉ एम ए वेंकटेश, डॉ जे बी गुरव, डॉ मच्छिंद्र चव्हाण ,डॉ मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ संजय मंडकमाले, प्राचार्य अंजली कन्नावार , सौ जे.बी सेठी, शितल गायकवाड, विलास भाटे, नामदेव गायकवाड, मेधा समन्वयक प्रा जी.बी. काळे, डॉ विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे, आदींसह सर्व विभाग प्रमुख क्रीडाशिक्षक शिक्षक व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्युझिकल स्पोर्ट मध्ये निडो स्कूलची इलेस्टिक गर्ल रुणझुन फटांगरे हिने ७० फूट उंचीवरून सादर केलेले योगाचे प्रात्यक्षिक अंगावर शहारे आणणारे ठरले. स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी या भव्य मैदानावर १०० मीटर २०० मीटर व ४०० मीटर रनिंग मध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तरी यानंतर म्युझिकल स्पोर्ट मध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व जुनिअर कॉलेजच्या २५० विद्यार्थ्यांनी हॉकी खेळाच्या थीमवर डान्स सादर केला. तर अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली परेड आणि त्यानंतर बास्केटबॉल वर सादर केलेले चित्र थरारक प्रात्यक्षिकासह मार्शल आर्ट मधील अग्निदिव्य करताना झालेले क्रीडा प्रकार हे लक्षवेधी ठरले.
याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, एमबीए, आयटीआय,ज्युनिअर कॉलेज, बी फार्मसी, डी फार्मसी यांनी बास्केटबॉल हॉलीबॉल यावरील नृत्याने संपूर्ण मैदानावर टाळ्यांचा गजर केला. म्युझिकल स्पोर्ट ही आलो की थीम राबवताना यामध्ये अमृतवाहिनीतील ७२०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नयनरम्य सोहळा यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम दिमाखदार झाला. यावेळी बोलताना हॉकीपटू युवराज वाल्मिकी म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना स्पोर्टच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत इतके चांगले दर्जेदार खेळाडू या ठिकाणी असून आगामी काळात अमृतवाहिनीतील अनेक खेळाडू विविध खेळांमधून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.यानंतर झालेली आकर्षक आतिषबाजी , विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य यामुळे यावर्षीचा मेधा हा सांस्कृतिक आणि क्रीडा कलागुणांना वाव देणारा ठरला.
विद्युत रोषणाईत अमृतवाहिनी निडोचा परिसर ठरला आकर्षण
मेघा सांस्कृतिक महोत्सवात प्रथमच म्युझिकल स्पोर्ट्स ही संकल्पना राबवली असून अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या अद्यावत भव्यदिव्य इमारतीसमोर असलेल्या प्रशस्त मैदानावर झालेली विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आणि सजलेला परिसर यामुळे या इमारतीसह हा हा निसर्ग रम्य परिसर विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षण ठरला.