जागतिक एड्स दिन साधना विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न
जागतिक एड्स दिन साधना विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न
जागतिक एड्स दिन साधना विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर प्रतिनिधी दि २ डिसेंबर २०२५–जागतिक एड्स दिनानिमित्त साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज मध्ये एड्स जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती, गैरसमज दूर करणे आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयी जागरूक राहण्याचे आणि समाजातील संक्रमित व्यक्तींबद्दल समज व सहानुभूती ठेवण्याचे आवाहन केले. तसेच एचआयव्ही संसर्गाची कारणे, प्रतिबंधक उपाय, सुरक्षित वर्तन, उपचारपद्धती आणि मोफत ART सेवांची माहिती विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने दिली. एड्सविषयी पसरलेल्या अफवा, भीती आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याचे तसेच संक्रमित व्यक्तींसोबत भेदभाव न करण्याचे त्यांनी विशेष महत्त्व सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “एड्समुक्त समाज”, “माहिती म्हणजे संरक्षण” आणि “सुरक्षित वर्तन” या विषयांवरील संदेशमूल्य असलेली चित्रे व घोषवाक्ये उठावदार ठरली. तसेच निबंध स्पर्धा ही घेण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जनजागृती नाटिका, घोषवाक्य स्पर्धा, आणि रेड रिबन मोहीम यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत जागृक युवा पिढी समाजात सकारात्मक बदल घडवू शकते, असे उद्गार काढले. जागतिक एड्स दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण व संवेदनशील ठरल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव डी. जी., उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे उपस्थित होते. तसेच विज्ञान विभाग प्रमुख सावंत डी. बी., ज्युनिअर कला व वाणिज्य विभागातील जेष्ठ सहकारी कणसे पी. एस., हरितसेना प्रमुख चंदनशिवे ए.एस. साधना खोत, बोडके आर. व्ही.,.वार एस. आर., वाघ जी. ए., बोरसे सर, शिंदे एस. आर., ननवरे एच. डी., माने एच. आर. जुनिअर कॉलेजचे सर्व सहकारी शिक्षक बंधू – भगिनी आणि हरित सेनेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






