आपला जिल्हा

कोयटेंनी प्रचार पातळी सोडल्याने विवेक कोल्हे यांनी सुनावले खडेबोल

कोयटेंनी प्रचार पातळी सोडल्याने विवेक कोल्हे यांनी सुनावले खडेबोल
तुमचे कारनामे सांगायला सुरू झालो तर दिवस कमी पडतील 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ नोव्हेंबर २०२५कोपरगाव शहराचे कुठलेही भले आजपर्यंत न केलेल्या व्यक्ती कोल्हे कुटुंबावर तथ्यहीन भाष्य करतात त्यावेळी त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी जनता सक्षम कारण कोल्हे कुटुंबाने आजवर केलेली विधायक कामे जनतेसमोर आहे.स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अनेकांना पुढे आणले त्यात कोयटे होते हे ते सोयीस्कर विसरले असावे.आमच्यावर बालिश आरोप करणारे कोयटे सुपुत्र हे वर्षानुवर्ष दिसत नाही त्यांनी वर नाकाने चोर वर्ष चोर वर शिरजोर यासारखे बोलू नये.

जाहिरात

काका कोयटे यांच्यावर ४२० सारखे आरोप झालेले आहेत. फसवणूक, ठकवनुक,विश्वासघात या सारखे आरोप त्यांच्या गुन्हे नोंदीत दिसतात त्यामुळे कुणावर खोटे आरोप करण्यापूर्वी त्यांच्या सुपुत्राने अभ्यास केला पाहिजे. स्वतः संदीप कोयटे यांच्याकडे कॅनरा बँकेची थकीत कर्जाची परतफेड न केल्याने वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झालेल्या आहेत.

जाहिरात
केवळ काही तरी यांना लपवा छपवी करायची असल्यामुळेच त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली असताना पुन्हा हा निवडणुकीचा निर्णय घेतला आहे हे सर्वश्रुत झाले आहे.व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करण्यात आम्हाला अधिकचा रस नाही आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन काम करणारे लोक आहोत पण जर कुणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी आपली आहे.मी कोल्हे साहेबांचा नातू आहे त्यामुळे विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम करणार आहे. टिळकनगर येथील प्रभाग सातमध्ये कॉर्नर सभेत ते बोलत होते.या प्रभागातील दोन्ही उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी भरीव लीड द्यावे मी या प्रभागाचे विकासाचे पालकत्व स्वीकारेल असे आवाहन मतदारांना कोल्हे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे