संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंत्यांची दिपेश  इंजिनिअरींग मध्ये नोकरीसाठी निवड

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंत्यांची दिपेश  इंजिनिअरींग मध्ये नोकरीसाठी निवड

    ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची यशस्वी वाटचाल

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ३१ मार्च २०२४संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या नियोजनानुसार डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रातील दिपेश इंजिनिअरींग या आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील  तीन अभियंत्यांची आकर्षक  पगारावर त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड  पी विभागाच्या वर्षभराच्या नियोजनानुसार एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत असुन अशा  प्रकारे या विभागाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात

          दिपेश  इंजिनिअरींग कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये सार्थक दत्तात्रय आभाळे, मोईझ पाशु शेख व प्रसाद गजानन नर्सिकर यांचा समावेश  आहे. मागील वर्षी  टी अँड  पी विभागाच्या प्रयत्नाने सुमारे ७७० नवोदित अभियंत्यांना वार्षिक  पॅकेज  २० लाख रुपये पर्यंच्या नोकऱ्या  देण्यात आल्या होत्या. चालु वर्षीही  या विभागाची यशस्वी घौडदौड चालु असुन संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे नामांकित कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  अभ्यासक्रमात असल्यामुळे संजीवनीचे नवोदित अभियंते कंपन्यांच्या कसोटीत उतरत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी छाटेखानी कार्यक्रमात तिघांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, टी अँड  पीचे डीन डॉ. विशाल  तिडके, विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे , समन्वयक प्रा. अतुल जोशी  उपस्थित होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी दिपेश इंजिनिअरींग कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या तीन अभियंत्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.

  मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असुन मला तेथील एखाद्या  इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सहज प्रवेश  मिळाला असता. परंतु संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे नोकरी मिळवुन देण्यात व त्या दृष्टीने  तयारी करून घेण्यात आघाडीवर असते, हे मी वेगवेगळ्या  प्रसार माध्यमांच्याद्वारे ऐकले होते, पाहिले होते. म्हणुन मी संजीवनी मध्येच प्रवेश  घेतला. येथे पहिल्या वर्षापासूनच  संभाषण  कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा, सभाधिटपणा, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण  तर दिल्याच जाते. परंतु, शेवटच्या वर्षात  असताना टी अँड  पी विभागाने कंपनीच्या गरजेनुसार आमची तयारी करून घेतली. कंपनीच्या मुलाखतीच्या अगोदर आमच्या मुलाखती घेतल्या. यामुळे दिपेश  इंजिनिअरींग कंपनीच्या कसोटीत मी सहज उत्तिर्ण झालो. चार वर्षांपूर्वी  ज्या विश्वासाने मी संजीवनी मध्ये दाखल झालो होतो, ते माझे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले. –नवोदित अभियंता प्रसाद नर्सिकर      

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे