कोपरगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
कोपरगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
जाहिरात कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२५- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांनी पदभार घेतल्यापासून एकदाही कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरण ही केले नाही त्यामुळे कोपरगांव तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोमवार दि १७ मार्च रोजी धरणे आंदोलन करून निवासी तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
जाहिरात आत्मा
दिलेल्या निवेदनाद्वारे शासनाकडे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा,१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी,मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासन आदेश त्वरित निर्गमित करण्यात यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन त्वरित करावे, डी सी पी एस/एन पी एस योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी, अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्याच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतन वाढ व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करावी, शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करावा, एमफील , एम एड ,पीएचडी धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे आदी मागण्या केल्या आहे.जाहिरात
त्याचबरोबर महासंघाशी चर्चा करावी आणि मान्य मागण्यांची पूर्तता करावी.समस्यांचे निराकरण करावे अन्यथा यापुढे आम्हाला याहून तीव्र आंदोलन करावी लागेल व आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार असाल अशा प्रकारचा इशारा कोपरगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र हिंगे ,सचिव प्रा. बाबासाहेब आभाळे यांनी निवासी नायब तहसीलदार सातपुते यांना निवेदन देत दिला आहे.जाहिरात
याप्रसंगी माजी अध्यक्ष प्रा डॉ. सुरेश काळे., प्रा.बाळासाहेब कोल्हे ,प्रा बाबासाहेब वाघ , प्रा.किशोर पाटील ,प्रा. भाऊसाहेब आरोटे , प्रा.सुनील चव्हाण,प्रा.विठ्ठलराव बारहाते , प्रा. विक्रम कुलकर्णी , प्रा. दत्तात्रय मोरे, प्रा.शेख सर ,प्रा.सचिन काशीद ,प्रा.महेश दरेकर, प्रा.अमोल ठोंबरे, प्रा. भारत पवार, प्रा.कैलास धनवटे, प्रा.प्रशांत त्रिभुवन , प्रा.निलेश कोळसे, प्रा.किरण तुरकणे, प्रा.कांबळे सर, प्रा.आशा जाधव आदी उपस्थित होते तर सदर निवेदनावर तालुक्यातील सर्व संघटनेच्या सभासद बंधू भगिनी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.जाहिरात