के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान
कोपरगाव विजय कापसे दि २९ एप्रिल २०२४–कोपरगांव येथील कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सोमवार दि. २९ रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम विविध स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी कोपरगाव शहरात प्रभात फेरी काढली.
या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !” अशा घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचे संदेश फलक हातात घेऊन प्रभात फेरीत घोषणाही दिल्या.
सदर प्रभात फेरी महाविद्यालयातुन सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक यामार्गे निघून कोपरगाव तहसील कार्यालय येथे समाप्त झाली.
याप्रसंगी तहसीलदार संदीपकुमार भोसले, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी प्रभात फेरीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. मतदार जनजागृती प्रभात फेरीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रभात फेरीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.