एस एस जी एमचे प्राचार्य डॉ. सानप तसेच प्रा. कातोरे व प्रा. साळुंखे या रयत सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
एस एस जी एमचे प्राचार्य डॉ. सानप तसेच प्रा. कातोरे व प्रा. साळुंखे या रयत सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
एस एस जी एमचे प्राचार्य डॉ. सानप तसेच प्रा. कातोरे व प्रा. साळुंखे या रयत सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २९ एप्रिल २०२४ – कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एस. जी. एम. कॉलेजमधील प्र. प्राचार्य डॉ.रमेश सानप तसेच व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील प्रा. वसंत कातोरे, द्विलक्षी अभ्यासक्रम विभागातील प्रा. राजेंद्र साळुंखे हे प्राध्यापकसेवक नियत वयोमानाप्रमाणे व शासकीय नियमाने ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि निवडणूक २०२४ ची कामे यामुळे या सेवकांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ २७ एप्रिल रोजी महाविद्यालयात घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे भूतपूर्व सदस्य मा.छबुराव आव्हाड हे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.महेंद्रकुमार काले हे उपस्थित होते. तसेच मा. हिरालाल महानुभाव यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या मान्यवरांच्या शुभहस्ते तीनही सत्कारमूर्तींचा सपत्नीक स्नेहवस्त्र,मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्तींना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे आणि महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी शुभेच्छा पाठविल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी महेंद्र कुमार काले यांनी, उत्तम सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्तमप्रकारे आयोजित केल्याबद्दल सेवक कल्याण समितीला धन्यवाद दिले. तसेच प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी अहोरात्र आपला वेळ देऊन, दीर्घ काळाचा विचार करून महाविद्यालयीन कामाला न्याय दिला, याचा उल्लेख करून त्यांच्या नेतृत्वाने महाविद्यालयाला मिळालेल्या A++ या मानांकनाचे श्रेयही त्यांना दिले. महाविद्यालयाला उच्चतम असा सन्मान प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचे तसेच सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. विशेष उपस्थिती लाभलेले विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव यांनी मनोगत व्यक्त करताना, आपले सहाध्याही राहिलेल्या या सत्कारमूर्ती मित्रांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. साळुंखे, प्रा.कातोरे, प्रा. सानप हे संशोधन कार्य, कर्तुत्व, कार्य कुशलता अशा विविध बाबींतही संपन्न असल्याचे काही प्रसंगांतून त्यांनी दाखवून दिले.
या मान्यवरांबरोबरच महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब वर्पे यांनी प्राचार्याबरोबर असलेल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच्या मैत्रीला उजाळा दिला. प्रा. सरोदे मॅडम, प्रा.किशोर पाटील, प्रा. दयानंद सूर्यवंशी, प्रा.व्ही.बी. गायकवाड, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, कला विभागाच्या उपप्राचार्य प्रा. उज्ज्वला भोर ,माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. शीला गाढे, स्नेही मनीषा बारबिंड, रोहन पाटील इत्यादींनीही सत्कारमूर्तींच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला. सर्वांच्याच मनोगतातून प्र प्राचार्य डॉ. रमेश सानप यांचे नेतृत्व, कर्तृत्व, त्यातून महाविद्यालयाचा झालेला कायापालट व महाविद्यालयाला मिळालेले नॅकचे ए ++ मानांकन या बाबी अधोरेखित केल्या गेल्या.
अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सेवापूर्ती सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रा वसंत कातोरे आणि प्रा. राजेंद्र साळुंखे यांनी विद्यार्थी अवस्थेपासून तर सेवेची संधी मिळून सेवापूर्तीपर्यंत आपल्याला कै.मा. काळे साहेब यांच्यापासून अनेक मान्यवरांचे अमूल्य सहकार्य व योगदान कसे लाभले ते सांगून त्यांच्याविषयी, रयत शिक्षण संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर प्र. प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी आपल्या या दोन्ही सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव करून त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक, समिती प्रमुख, नॅक समन्वयक आणि प्र.प्राचार्य अशा विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी आपल्याला कशी मिळाली, ते सांगून आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.ॲड. भगीरथ शिंदे तसेच इतर अनेक मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शारीरिक व्याधींमध्ये पत्नीची खंबीर साथ मिळाल्याचा उल्लेख करून त्यांनी पत्नी आणि आपल्याला घडविणाऱ्या आई-वडिलांविषयीही भावपूर्ण शब्दांत कृतज्ञता व्यक्त करुन आपल्या यशस्वी वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा व स्थान असल्याचे सांगितले.या तीनही सत्कार मूर्तीच्या स्नेहींपरीवाराथिल आणि कुटुंबातील अनेकजण उपस्थित होते त्यांनी सदर प्रसंगी सत्कार मूर्तीचा सत्कार केला.
सदर कार्यक्रमासाठी हिरालाल महानुभाव यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील तीनही शाखांचे उपप्राचार्य, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांसह पंचक्रोशीतील अनेक मानवरांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा.एस.एस.शिंदे यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. वैशाली सुपेकर, प्रा. रवींद्र हिंगे यांनी सूत्रसंचालन केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय सेवक कल्याण समितीचे चेअरमन,सदस्य व आयोजकांनी केले होते.