आपला जिल्हा

कोपरगावात मोफत कान नाक घसा तपासणी शिबिर संपन्न

कोपरगावात मोफत कान नाक घसा तपासणी शिबिर संपन्न
गरजूनी घेतला लाभ
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ मे २०२४डी व्ही जोशी चॅरिटेबल ट्रस्ट व साईदिप ए एन टी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कान नाक घसा तपासणी शिबीर रविवार दि २८ एप्रिल रोजी एस जी विद्यालय कोपरगाव येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा मोठया संख्येने गरजुनी लाभ घेतला.

जाहिरात
 दिवसेंदिवस  बहिरेपणाचे वाढते प्रमाण तसेच व्यसनाधीनते मुळे वाढते ओरल कॅन्सर चे प्रमाण तसेच या आजारांच्या तज्ञ डॉक्टर्स चा ग्रामीण भागातील आभाव याचा विचार करून या शिबीराचे आयोजन करण्याचा आले होते.मूळ कोपरगाव चे असलेले व सध्या पुणे येथे कार्यरत सुप्रसिद्ध ई एन टी सर्जन डॉ अमोल दिलीप जोशी यांनी स्वतः या शिबिरात रुग्णांचे उपचार केले.या शिबिरामध्ये ट्रस्ट तर्फे काही गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले तसेच जन्मजात कर्णदोष , श्वसन विकार, सायनस चे आजार अशी विविध रुग्णांचे उपचार कऱण्यात आले.

जाहिरात
या शिबिरासाठी श्रीमान गोकुलचंद विद्यालयाचे अध्यक्ष कैलासशेठ ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, आनंद ठोळे, चेतन खुबाणी, माजी नगराध्यक्ष विजयराव वाहाडणे, जेष्ठ नेते टेकचंद खुबाणी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली तर शिबीर यशस्वीतेसाठी एस जी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर , उपमुख्याध्यापक गायकवाड सर, रायते मॅडम व गोरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे