सेवाभावी उपक्रमात ठोळे परीवार सदैव जेष्ठ नागरिक संघासोबत – उद्योजक ठोळे
जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन

कोपरगाव विजय कापसे दि २२ मे २०२४ – सामाजिक सेवाभावी उपक्रमात ठोळे परीवार सदैव जेष्ठ नागरिक संघासोबतच असेल असे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक कैलासचंद ठोळे यांनी कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करते प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

प्रसंगी ठोळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कै. भागचंद भाऊ यांनी जे स्वप्न, जे विचार बाळगून जेष्ठ नागरिक सेवा मंचची स्थापना केली तो विचार, सेवाभाव जपण्यासाठी आमचा ठोळे परीवार आजही कटिबद्ध आहे. सामाजिक सेवाभावी उपक्रमात पाहिजे ती मदत करायची तयारी आहे.जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या माध्यमातून आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले गेले आहेत.वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा दिली गेली आहे. यापुढेही मदतीला आम्ही कटिबद्ध राहु असे ठोळे यांनी या प्रसंगी सांगितले.

जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित समारंभात स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले तर या प्रसंगी डॉ. विलास आचारी, उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.





