आत्मा मलिक हॉस्पिटलआपला जिल्हा

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचा शंभर टक्के निकाल

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचा शंभर टक्के निकाल

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्याचा शंभर टक्के निकाल

जाहिरात

येवला विजय कापसे दि २८ मे २०२४महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात येवला येथिल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित, आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलचा १०० टक्के  निकाल लागला आहे.

जाहिरात

मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी च्या परीक्षेस विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित, आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलचे ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यात ९० पेक्षा जास्त गुण  मिळविणारे १ विद्यार्थी, ८५ पेक्षा जास्त गुण मिळविणारे ८ विद्यार्थी तर ८० पेक्षा जास्त गुण मिळविणारे २ विद्यार्थी असे एकूण ११ विद्यार्थी यशस्वी झाले आहे.

जाहिरात

यात समीक्षा मनोज थळकर ९२.८०%,रोशनी संजय कोतवाल ९०%,श्रेयस अविनाश नागपुरे ९०%,पायल सचिन थळकर ८९.२०% ,मृणाल संतोष रायजादे ८७.२०%,अंजली मोहन चव्हाण ८६.२०%,ओम प्रमोद पाटील ८६%,मयुरी मनोज क्षीरसागर ८६%,अनन्या आनंद कायस्थ ८४.६०%,वैष्णवी प्रमोद चव्हाण ८०.८०% तर यश नितीन कायस्थ ७८.८० % टक्के मार्क मिळवत यशस्वी झाले आहेत.

जाहिरात

परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष  नंदकुमार सूर्यवंशी, संस्थेचे सरचिटणीस तथा येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनामुळे गुरुकुलाच्या पहिल्या १० वी च्या बॅचचा निकाल १०० % टक्के लागला. असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना सरचिटणीस हनुमंत भोंगळे यांनी  पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तसेच गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे व सर्व स्टाफ यांनी देखील विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे