संजीवनी साखर कारखाना

साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ संचालक यशवंत गिरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार

साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ संचालक यशवंत गिरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
साखर आयुक्त कार्यालयाचे अर्थ संचालक यशवंत गिरी यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ जुन २०२४साखर आयुक्त पुणे कार्यालयाचे अर्थ संचालक श्री. यशवंत गिरी यांनी नुकतीच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस भेट देवुन विविध रासायनिक उपपदार्थ प्रकल्पांची माहिती घेतली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

जाहिरात

             श्री. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने खुल्या आर्थीक स्पर्धेत स्वतःला सिध्द करत साखर, आसवनी व त्यावर अवलंबुन असणा-या विविध उपपदार्थाची राज्यात सर्वप्रथम निर्मीती करून विविध प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली तसेच देश विदेशातील गेल्या ४० वर्षातील साखर उद्योगातील चढ उतार व त्यावरील उपाय योजनांची माहिती देवुन उस दराची एफआरपी ही कमीत कमी साखर विक्री मुल्याशी लिंक असतांनाही त्याची अजुनही कार्यवाही झाली नसुन केंद्र व राज्य शासनाने त्याबाबत पावले उचलावी अशी विनंतीही बिपीनदादा कोल्हे यांनी शेवटी केली.

जाहिरात

          श्री. यशवंत गिरी यांनी सर्व प्रकल्पांची माहिती घेवुन सहकारात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीची प्रशंसा करत गौरवोदगार काढले. याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे