सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र कोळपे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र कोळपे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र कोळपे
कोपरगांव विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५ – संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देशात नांवाजलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपदाची निवडणुक गुरूवारी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अहिल्यानगरचे प्रादेशिक उप संचालक (साखर) संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली.
राजेंद्र कोळपे यांच्या नावाची सुचना संचालक त्रंबकराव सरोदे यांनी केली, तर त्यास संचालक निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले. विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते मावळते उपाध्यक्ष मनेष गाडे व नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचा सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून संजीवनीत सर्वप्रथम विविध रासायनिक उपपदार्थाची निर्मीती केली. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली देशात सर्वप्रथम थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल उत्पादनात या कारखान्यांने आघाडी घेत औषधनिर्मीती क्षेत्रात पाउल ठेवत त्यासाठीच्या कार्यक्षम आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर संशोधनात्मक प्रयोगशाळांची उभारणी केली आहे. हंगामी ऐवजी बारमही रोजगार निर्मितीसाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभारणीबाबत काम सुरू आहे, त्याचबरोबर सी. एन. जी गॅस प्रकल्पाची उभारणी अंतीम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, निवृत्ती कोळपे, कैलासराव माळी, सोपानराव पानगव्हाणे, पराग संधान, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सौ. उषाताई संजयराव औताडे, सौ. सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, सतिष आव्हाड, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, केशवराव भवर, प्रदिपराव नवले, अंबादास देवकर, साहेबराव रोहोम, संभाजीराव गावंड, शरद थोरात, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.