आमदार आशुतोष काळे

गौतम बँक खेडलेझुंगे पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार-आ. आशुतोष काळे

गौतम बँक खेडलेझुंगे पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार-आ. आशुतोष काळे

 

गौतम बँक खेडलेझुंगे पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार-आ. आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑगस्ट २०२४:- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या ‘विना सहकारनाही उद्धार’ या आदर्श विचारसरणीवर मार्गक्रमण करीत असतांना मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सर्व सलग्न सहकारी संस्था प्रगतीपथावर आहे. यामध्ये गौतम बँक देखील प्रगतीच्या दिशेने घौडदौड करीत आहे.बँकेची नवीन शाखा सुरु करण्यात आली असून कारखाना कार्यक्षेत्रातील खेडलेझुंगे व पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा गौतम बँक पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे गावात वै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथ महाराज खटाणे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौतम सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र ढोमसे व त्यांच्या सुविद्य पत्नी  निर्मला ढोमसे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले कीवै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर काळे परिवाराचे गुरूस्थान आहे. संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथ महाराज खटाणे यांची मागणी होती कीखेडलेझुंगे गावात गौतम सहकारी बँकेची शाखा सुरु करावी. हा गुरूंचा आदेश समजून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेची शाखा सुरु केली. गौतम बँक प्रतिकूल परिस्थितीतून प्रगतीची शिखरे गाठत आहे. बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी असून बँकेचा नफा वर्षागणिक वाढत चालला असून यावर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश दिला आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकाराच्या माध्यमातून कारखाना व परिसर समृद्ध केला. तोच वारसा पुढे चालवितांना मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराची फळे कारखाना कार्यक्षेत्रातील परिसराला चाखता यावी या उद्देशातून खेडलेझुंगे व पंचक्रोशीतील शेतकरी व व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण होवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गौतम सहकारी बँकेची शाखा सुरु केली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

जाहिरात

याप्रंसगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव चव्हाणसंचालक राजेंद्र घुमरेडॉ. मच्छिंद्र बर्डेसचिन चांदगुडेश्रीराम राजे भोसलेसुनील मांजरेअशोक मवाळमाजी संचालक सुनील शिंदेकचरू घुमरेरंगनाथ घोटेकरनाशिक जि.प. सदस्य आनंदराव घोटेकरखेडले झुंगेच्या सरपंच माया सदाफळकेशवराव घोटेकररामनाथ घोटेकरइफकोचे संचालक शिवनाथ सदाफळमाजी सरपंच आर. आर. गीतेधोंडूभाऊ घोटेकरभुतडाखेडले झुंगे सोसायटीचे चेअरमन यादवराव सदाफळविजयराव सदाफळराजेंद्र गोर्डेयोगेश साबळेदिलीप घोटेकरब्राम्हणवाडे सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर गोसावी,गौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापूराव जावळेवै.योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थानचे विश्वस्त व भक्त मंडळतसेच बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुडमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडेवरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडेशाखाधिकारी संजय बरसे आदी मान्यवरांसह खेडलेझुंगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे