के. बी. रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

के. बी. रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
के. बी. रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि २ नोव्हेंबर २०२६– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांची पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आयुष पोकळे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

आयुष पोकळे याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशामुळे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आयुषने मिळवलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव व सर्व पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे व उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



