आपला जिल्हा

माधुरी दीक्षित यांच्या हस्ते अमृतवाहिनी बँकेचा गौरव; ग्रामीण भागात इतके मोठे काम, ओहो क्या बात है –माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित यांच्या हस्ते अमृतवाहिनी बँकेचा गौरव; ग्रामीण भागात इतके मोठे काम, ओहो क्या बात है –माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षित यांच्या हस्ते अमृतवाहिनी बँकेचा गौरव; ग्रामीण भागात इतके मोठे काम, ओहो क्या बात है –माधुरी दीक्षित
Sangmner vijay kapse दि ३ नोव्हेंबर २०२६–महाराष्ट्रामध्ये  बँकांमधून ग्राहकांना चांगल्या सुविधा ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ,सभासद व कर्जदारांचा विश्वास, डिजिटल प्रणाली यांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या 700 बँकांमधून मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव झाला असून ग्रामीण भागामध्ये इतके मोठे काम ओहो क्या बात है असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात
पुणे येथे सर्वत्र टेक्नॉलॉजी यांच्या वतीने राज्यभरातील उत्कृष्ट बँकांमधून टेक्नॉलॉजीच्या चांगल्या वापराबद्दल 25 बँकांचा सन्मान सर्वत्र टेक्नॉलॉजीच्या ब्रँड अँबेसिडर प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन वल्लभ भणसाळी, कार्यकारी संचालक मंदार आगाशे, वरिष्ठ सिनियर मॅनेजर आशुतोष पाठक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.अमृतवाहिनी बँकेच्या वतीने पुरस्कार बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांनी स्वीकारला.

जाहिरात
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने मागील तीन वर्षांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी मोठा वापर केला आहे. ज्यामधून डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे दर महिन्याला 50 ते 60 कोटी रुपयांचा व्यवहार होत आहे .फोन पे ,गुगल पे ,क्यूआर कोड ,मोबाईल ॲप, एटीएम या सर्व माध्यमातून ग्राहकांना चांगल्या तत्पर व उच्च सुरक्षित सुविधा पुरविल्या जात आहे. बँकेने नुकतेच व्हाट्सअप बँकिंग सुरू केले असून ग्राहकांनी 8308080488 हा क्रमांक टाईप करून त्यावर फक्त हाय मेसेज पाठवल्यावर बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ मिळतो.

जाहिरात

यावेळी बोलताना सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाल्या की, सहकार चळवळ ही महाराष्ट्राची देशाला मोठी देन  आहे. खरे तर ग्रामीण भागामध्ये सहकाराचे मोठे महत्त्व आहे. अशा कार्यक्रमांमधून सहकाराला प्रोत्साहन केल्याने नवी पिढी  या सहकार चळवळी बरोबर जोडली जाईल. राज्यभरात सातशे बँकांनी केलेले काम हे नक्कीच कौतुकास्पद आहे तर संगमनेरच्या अमृतवाहिनी बँकेने ग्रामीण भागामध्ये 1275 कोटींचा टप्पा पार करणे हे मोठे कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या

यावेळी व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे म्हणाले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कायम सभासद कर्जदार शेतकरी नागरिक यांचे हित जोपासले आहे. अमृतवाहिनी सहकारी बँकेने बाराशे 75 कोटींचा व्यवसाय नुकताच पार केला असून नव्याने संगमनेर तालुक्यातील धांदरफळ व इगतपुरी तालुक्यातील साकुर या ठिकाणी दोन नवीन शाखा उघडले आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये ही शाखा सुरू करण्याचा बँकेचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की या पुरस्काराने काम करण्यास अधिक बळ मिळाले असून यापुढील काळात जास्तीत जास्त नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्याबरोबर सर्व नागरिक व युवकांना स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन करण्यात येईल असे ते म्हणाले.

बँकेच्या या यशाबद्दल बँकेचे चेअरमन , व्हा .चेअरमन व सर्व संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, डॉ मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, इंद्रजीत भाऊ थोरात,शंकरराव खेमनर, ॲड माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, राजेंद्र चकोर राजेंद्र कडलक राजेंद्र गुंजाळ, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागात इतके मोठे काम ओहो क्या बात है–माधुरी दीक्षित

सहकाराने सर्वत्र समृद्धी निर्माण केली आहे संगमनेरचा सहकार हा तर मार्गदर्शक ठरणार आहे. अमृतवाहिनी बँकेने ग्रामीण भागात मोठा विश्वास निर्माण केला असून क्या बात है असे म्हणत अमृतवाहिनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी केले असून ॲड नानासाहेब शिंदे यांनी त्यांना संगमनेर मधील विविध सहकारी संस्थांना भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे