आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न 

सोमैया महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न

सोमैया महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२५के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रारंभी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तदनंतर ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित  ग्रंथ-प्रदर्शनाचे अशोकराव रोहमारे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी रोहमारे यांनी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त शुभेच्छा देताना करियर करण्यासाठी वाचनाचे महत्त्व प्रतिपादित केले. तसेच प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी देखील उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना शुभेच्छा देताना  महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ व उपयुक्त ग्रंथ असल्याने विद्यार्थ्यांनी या ग्रंथांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रंथपाल डॉ. नीता शिंदे यांनी देखील ग्रंथालयात असलेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील मौल्यवान ग्रंथांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे होण्याचे आवाहन केले.

जाहिरात

या कार्यक्रमाला ग्रंथालय समितीचे अध्यक्ष प्रो. डॉ. जिभाऊ मोरे,  विज्ञान शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बापूसाहेब भोसले,  डॉ. बाळासाहेब गायकवाड, रजिस्ट्रार डॉ अभिजीत नाईकवाडे, प्रो. डॉ. संजय अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. शंकरय्या कोंडा, डॉ. निलेश पोटे आदी प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे  विकास सोनवणे,  गणेश पाचोरे, रवींद्र रोहमारे,  अजय पिठे, महेश हजारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे