आपला जिल्हा

मंत्री ना.आदिती तटकरे यांनी दिली लोणी येथील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयास सदिच्छा भेट

मंत्री ना.आदिती तटकरे यांनी दिली लोणी येथील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयास सदिच्छा भेट

मंत्री ना.आदिती तटकरे यांनी दिली लोणी येथील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयास सदिच्छा भेट

जाहिरात

Loni vijay kapse दि ६ एप्रिल २०२६- पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यानीं जिल्ह्यात एकल महीलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून महीला व बाल कल्याण मंत्री ना.आदिती तटकरे यांनी अंमलबजावणीची माहीती जाणून घेतली. एकल महिलांच्या उत्कर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्याने विशेष पुढाकार घेतला आहे.

जाहिरात

मंत्री ना.आदिती तटकरे यांनी लोणी येथील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. मंत्री विखे पाटील यांच्यासह डॉ.विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे यांनी स्वागत केले. आ.काशिनाथ दाते, आ.अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह महीला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

जिल्ह्यात महीला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील महीलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहीती देताना जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्‍या जयंती वर्षाचे औचित्य साधून एकल महिलांच्या उत्कर्षासाठी सुरू केलेल्या कामाची माहीती मंत्री आदिती तटकरे यांना दिली.

जाहिरात

जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ग्रामीण भागात १ लाख ५ हजार आणि ग्रामीण भागात २२ हजार एकल महिलांची संख्या आढळून आली. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून, महीलांच्या आवडीनूसार उमेद अभियान, महीला बचत गट, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थाच्या सहभागाने प्रशिक्षण देवून प्रोत्साहन दिले जात आहे. आतापर्यत एक हजाराहून अधिक महीलांना अर्थिक सक्षम करण्यात यश आले असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी मंत्री तटकरे यांना दिली.

महीला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयाकरीता ३२ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यामातून १२ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महीला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभारण्यात येणार असून, अहि‍ल्यानगर जिल्ह्यातील भवनही त्या दृष्टीने उभारण्यात यावे. यासाठी पुण्यातील भवनाच्या इमारतीचा आराखडा पाहाण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी महीला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे