खा.राहुल गांधी यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचा संगमनेर येथे निषेध
कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रांताधिकाऱ्याना कारवाईसाठी निवेदन
संगमनेर विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४- लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकारी यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॉग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यानी कारवाईसाठी नुकतेच प्रांताधिकाऱ्याना निवेदन दिले.
सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी खा.राहूल गांधी बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला असून कारवाईबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, संगमनेर तालुकाध्यक्ष विजय शेळके, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, सरचिटणीस रवींद्र शिंदे, विनोद गायकवाड, शहर कार्याध्यक्ष सुरेश खामकर, श्रावण गायकवाड, आव्हाड, विलास गायकवाड, विजयराव शेळके, उत्तमराव गायकवाड, अशोक उंबरकर, सोमनाथ पवार आदिसह तालुक्यातील कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद हे एक सवैधानिक पद असून या पदावरील व्यक्तीबाबत सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेले विधान हे निषेधार्ह आहे. खासदार बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी पक्षातील दोन्ही वाचाळवीरावर कारवाई झाल्याशिवाय कॉग्रेस कार्यकर्ते शांत बसणार नाही.
विजय शेळके, तालुकाध्यक्ष
कॉग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, संगमनेर