सह्याद्री ज्युनिअर कॉलेजची सीईटी स्पर्धा परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजची सीईटी स्पर्धा परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी
संगमनेर प्रतिनिधी दि १७ जुन २०२४– अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या शाखांना प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचे निकाल नुकतीच जाहीर झालेले असून या परीक्षेमध्ये भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. मानसी संदीप गवांदे हिने पी.सी.बी. ग्रुप मध्ये 99.63 पर्सेंटाइल व पी.सी.एम. ग्रुप मध्ये 99.53 परसेंटाइल गुण मिळवून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला असल्याची माहिती प्राचार्य के.जी. खेमनर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य खेमनर म्हणाले की, मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व संस्थेचे चेअरमन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री जुनियर कॉलेजमध्ये सीईटी व नीट परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत.
या परीक्षेसाठी विद्यार्थी सतत दोन वर्ष अविरत मेहनत घेत असतात. या परीक्षेची काठीण्य पातळी लक्षात घेता व जीवघेण्या प्रवेश स्पर्धेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी साठी विशेष वर्ग म्हणून चालवल्या जाणाऱ्या डायमंड बॅचमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
कॉलेजचे प्राचार्य मा. के. जी. खेमनर सर , उपप्राचार्य यांचे मार्गदर्शनाखाली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स व बायोलॉजी या महत्वपूर्ण विषयांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी अनुभवी विषय तज्ञ शिक्षकांची समिती तयार करून सदर शिक्षकांनी एम एच टी सी इ टी, नीट, जेईई अशा विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वर्षभर विषय निहाय प्रॅक्टिस टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. विद्यार्थी आणि पालक वर्ग यांनी सदर उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्व परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
पीसीबी ग्रुप मध्ये कु.आदिती पोपट काळे 99.38 पर्सेंटाइल कु.आदिती भास्कर शिंदे 99.38 परसेंटाइल,कु.राजेश्वरी चांगदेव वाकचौरे 95.01 परसेंटाइल कुमारी रेवगडे तेजस सिताराम 92.88 परसे टाईल तसेच पीसीएम ग्रुप मध्ये कु. साक्षी संजय शिंदे 98.93 परसेंटाइल कु. अदिती पोपट काळे 98.32 परसेंटाइल वेदांत अशोक सागर 97.64 पर्सेंटाइल कु.सानिका माधव गोपाळे 97.46 परसेंटाइल तसेच इतरही अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम पर्सेंटाइल मिळवलेले आहेत व वरील सर्व विद्यार्थी त्या त्या क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रविष्ट होऊ शकतील. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य के.जी. खेमनर सर तसेच सर्व विषय तज्ञ शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात , संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे, संचालिका दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे , सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, खजिनदार तुळशीनाथ भोर, व रजिस्ट्रार आचार्य बाबुराव गवांदे आदींनी अभिनंदन केले आहे.