आमदार बाळासाहेब थोरात यांची खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेत; महाविकास आघाडीसह विजयात मोलाच्या योगदानाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून आमदार थोरात यांचे आभार व्यक्त
संगमनेर प्रतिनिधी दि १७ जुन २०२४– राज्यात महाविकास आघाडीच्या 31 जागा विजयी करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मविआच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
राजहंस दूध संघ येथे खासदार वाकचौरे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला तर दूध संघाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आमदार थोरात यांनी सत्कार झाला.यावेळी चेअरमन रणजीतसिंह देशमुख, आर.बी.रहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, विलास वर्पे, भारत शेठ मुंगसे, सुरेश थोरात, शिवसेनेचे अमर कातारी, अशोक सातपुते, उत्तमराव घोरपडे, विलास गुळवे,विष्णू ढोले, संतोष मांडेकर,वैष्णव मुर्तडक, नितेश शहाणे, अनिल भोसले कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
केंद्रातील सत्ताधारी भाजपाने 400 चा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला साफ नाकारले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 31 जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र सह शिर्डी व अहमदनगरची जबाबदारी होती. विदर्भातील रामटेक, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर ,परभणी ,नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, जळगाव, नंदुरबार, धुळे ,नाशिक, पुणे, शिरूर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी सभा घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या जोरदार प्रचार केला याला जनतेने ही मोठी साथ दिली.
अहमदनगर व शिर्डी ची जागा ही आमदार थोरात यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील 30 हजाराचे मताधिक्य खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना दिले. याचबरोबर आमदार थोरात यांची यंत्रणा शिर्डी व अहमदनगर मतदारसंघात कार्यरत होती. या भेटीनंतर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, ही निवडणूक जनतेच्या अस्मितेची होती. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाला फळ मिळाले असून भाजपाला महाराष्ट्राने रोखले आहे. यामध्ये आमदार थोरात यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
शिर्डी मतदारसंघांमध्ये आमदार थोरात यांची प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत होती.माजी आमदार डॉ सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, यांनी प्रचाराचे चांगले नियोजन केल्याने मोठे मताधिक्य मिळाले. याचबरोबर आमदार थोरात यांना मानणारा शिर्डी मतदारसंघ व अहमदनगर जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग असून अनेकांनी महाविकास आघाडीला मदत केली आहे. असेच काम यापुढेही सर्वांना करावयाची असून येणाऱ्या विधानसभेतही आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख यांनी स्वागत केले त्यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.