साई निवारा व सुभद्रा नगर मित्र मंडळाच्या वतीने गुणवंतांचा व पदोन्नती मिळालेल्यांचा सन्मान
साई निवारा व सुभद्रा नगर मित्र मंडळाच्या वतीने गुणवंतांचा व पदोन्नती मिळालेल्यांचा सन्मान
माजी नगरसेवक तथा साई निवारा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन कदम यांच्या संकल्पनेतून सत्कार सोहळा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २९ जुन २०२४– कोपरगाव तालुक्यातील व शहरातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंतांचा तसेच शासकीय नोकरीत पदोन्नती मिळवल्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा साई निवारा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन कदम यांच्या संकल्पनेतून साई निवारा व सुभद्रा नगर मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती प.पु १०८ राघवेश्वरनंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यात कोपरगाव बस आगारात कार्यरत असलेले अविनाश गायकवाड यांची अहमदनगर जिल्हा परिवहन विभागात वाहतूक निरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल, प्रथमेश सुभाष टेके यांची महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागात निरीक्षक पदी म्हणजेच फूड इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल, अनंत डिके यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तसेच ऋषिकेश जनार्दन कदम यांने सीईटी परीक्षेत ९९.२१% टक्के तर नीट परीक्षेत ५१७ गुण मिळवत यश प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.