आपला जिल्हा
स्व. शिवाजीराव संधान यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण
स्व. शिवाजीराव संधान यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण
स्व. शिवाजीराव संधान यांचे मंगळवारी प्रथम पुण्यस्मरण
कोपरगाव विजय कापसे दि २२ डिसेंबर २०२४–सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त स्व.शिवाजीराव आनंदराव संधान यांचे मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळील कलश मंगल कार्यालय (लॉन्स) येथे आयोजित केला आहे.
या प्रसंगी ठीक सकाळी १० वाजता ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांचा जाहीर हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असून तरी आपण उपस्थित राहावे असे आवाहन सुमन शिवाजीराव संधान,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग शिवाजीराव सांधान तसेच शांताराम भिकाजी संधान, नानासाहेब भिकाजी संधान, बाळासाहेब माधवराव संधान तसेच समस्त संधान परिवार दहिवडी तालुका सिन्नर व कोपरगाव यांनी केले आहे.