आपला जिल्हा

अनेक मातब्बर नेत्यांनी भूषवले कोपरगावचे नगराध्यक्ष पद; पण आता कोण होणार ही चर्चा

अनेक मातब्बर नेत्यांनी भूषवले कोपरगावचे नगराध्यक्ष पद; पण आता कोण होणार ही चर्चा
आता कोण होणार नगराध्यक्ष सर्वजण प्रतीक्षेत
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० नोव्हेंबर २०२५- कोपरगाव शहराला अत्यंत पौराणिक महत्व आहे.दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेली सर्वात मोठी गोदावरी नदी शहरातून वाहते तर अनेक साधू संत महंताच्या पादस्पर्शाने पावन झालेली कोपरगाव ही भूमी आहे या भूमीत राघोबा दादा यांचे देखील वास्तव्य राहिले आहे तर कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अशा या  पावन भूमीतील कोपरगाव नगरपालिकेची स्थापना होऊन ७७ वर्ष पूर्ण झाले या काळात कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष होण्याचा मान शकुंतला शांतीनाथ बोंडे यांनी मिळवत प्रथम महिला नगराध्यक्ष झाल्या तर १९४७ ते २०२५ पर्यंत तब्बल १९ वेळा तहसीलदार, मुख्याधिकारी, प्रशासक यांनी कारभार पाहिला.

जाहिरात

कोपरगाव नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून म्हणजेच १९४७ पासून शकुंतला शांतिनाथ बोंडे, उत्तमचंद छगनराम अजमेरे, रघुनाथ हनुमंतराव गिरमे, माधवराव कचेश्वर आढाव, प्रेमचंद पूनमचंद काले, डॉ.. कन्हैयालाल एकनाथ राठी, वामनराव श्रीपतराव शिलेदार, बाबुराव नामदेव गवारे, वसंतराव वासुदेव सातभाई, पद्मकांत शंकरराव कुदळे, अशोकचंद शोभाचंद कोठारी, साहेबराव वामनराव शिलेदार, राजेंद्र बाबुराव शिंदे, रवींद्र नामदेवराव पाठक, संजय वसंतराव सातभाई, सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, प्रकाश रामभाऊ शिंदे, व्ही.आर गोसावी, सिंधुबाई साहेबराव कोपरे, जगन्नाथ माधवराव आढाव, दिलीप आसाराम दारूणकर, बबनराव सहादु वाजे, कांचनबाई चनालाल काले, राजेंद्र मुरलीधर झावरे, राजेंद्र दत्तात्रय सोनवणे, मंगेश माधवराव पाटील, उज्वला अनिल जाधव, सुरेखा विनोद राक्षे, मीनल अशोक खांबेकर, ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई, विजय सूर्यभान वहाडणे या मातब्बर नेत्यांनी कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिला तर यातील अनेकांनी २ ते ३ वेळा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.

जाहिरात

 आता २०१६ नंतर म्हणजेच तब्बल ९ वर्षानंतर नगरपालिकेचा रणसंग्राम होत असताना कोपरगाव मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने भाजपाकडून पराग संधान, राष्ट्रवादीकडून काका कोयटे, शिवसेना ठाकरे गटाकडून सपना मोरे, शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र झावरे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह गेल्या टर्म मध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष झालेले अपक्ष उमेदवार विजय वहाडणे,योगेश वाणी,रहमुन्नीसा कुरेशी हे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यातून कोण होणार कोपरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष याकडे सर्व कोपरगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे