सोमैया व गंगागीर महाविद्यालयांना गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देत जाणून घेतल्या समस्या
सोमैया व गंगागीर महाविद्यालयांना गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देत जाणून घेतल्या समस्या
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २० जुलै २०२४-कोपरगाव शहरातील के. बी. रोहमारे व के. जे. सोमैया महाविद्यालय तसेच एस. एस. जी. एम. अर्थात श्री सद्गुरू गंगागीर महाराज या दोन्ही महाविद्यालयाला गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा शिवसैनिक गगन हाडा यांच्यासह युवासैनिकांनी भेट देत प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला भोर यांचा सत्कार केला.
जाहिरात
याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी हजर होते. ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध नसणे, वेळेची मर्यादा, शिक्षण व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करणे, अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध करून द्यावी, ग्रंथालयाचा वेळ वाढवावा, विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सुख-सुविधा देण्यात याव्यात, ग्रंथालयामध्ये चालू वर्षाचे तसेच नवीन अभ्यासक्रमाची जी पुस्तके नाहीत ती तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, बुक बँक ही योजना आपल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवावी, अशा अनेक बाबींवर गगन हाडा यांनी प्राचार्य यांच्याबरोबर चर्चा करून माहिती जाणून घेतली.
जाहिरात
तसेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट, बी. ए., बी. कॉम., बी.एसस्सी., एम. ए. इकॉनोमिक्स, इंग्रजी, हिंदी, हिस्ट्री, पॉलिटिक, मराठी, एम. कॉम. ॲडव्हान्स अकाउंटंट, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेश, एम. एसस्सी. बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मॅथ, मायक्रो फिजिक्स, पीएचडी. हिंदी, जिओग्रोफी, पॉलिटिक, केमिस्ट्री, फिजिक्स, झूलॉजी या अभ्यासक्रमाची पुस्तके देखील लायब्ररीमध्ये उपलब्ध करून द्यावेत. अशा काही बाबींची चर्चा गगन हाडा यांनी केली. तसेच काही विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्याही समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी निखील कंक्राळे, कान्हा हाडा, प्रतीक मोरे, विनायक टाक, गौतम निंदाने, वैभव शेलार, चेतन हाडा, अतुल बारहाते, रितेश वाघिले, रेहान शेख, साहिल पटवेकर जीवन बारहाते, गणेश भसाळे, साहिल पठाण आदी युवासैनिक उपस्थित होते.
जून महिन्यापासून नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने शहरात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी येत असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुरुवातीला येणाऱ्या अडचणी जाणुन घेत त्या संबधी दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या सोबत सकारात्मक चर्चा केली.