कै. केशवराव भाकरे यांच्या स्मरणार्थ संवत्सर गांवासाठी एक हजार रोपांचे रोपण
कै. केशवराव भाकरे यांच्या स्मरणार्थ संवत्सर गांवासाठी एक हजार रोपांचे रोपण
कै. केशवराव भाकरे यांच्या स्मरणार्थ संवत्सर गांवासाठी एक हजार रोपांचे रोपण
कोपरगाव विजय कापसे दि. १७ जुलै २०२४– कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गांवचे माजी उपसरपंच कै. केशवराव भाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सुनिल भाकरे व कोपरगांव येथील अश्वमेध उद्योग समुहाचे अध्यक्ष आयुर्वेदाचे प्रसारक डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी संवत्सर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद मराठी शाळा, प. पूज्य राजधरबाबा रोपवाटिका व महानुभाव आश्रम परिसरात सुमारे एक हजार विविध आयुर्वेदीक रोपांचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प आज युधवार रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पूर्ण केला.
संवत्सरचे उपसरपंच विवेकभाऊ परजणे, माजी उपसरपंच चंद्रकांत लोखंडे, भाऊसाहेब, कासार, लक्ष्मणराव परजणे, भिकाभाऊ कर्पे, मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण, संभाजी भाकरे, नामदेवराव पावडे, माणिकराव भाकरे, सोमनाथ निरगुडे, अनिल आचारी, कारभारी भाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांमध्ये हिरडा, बेहडा, आडुळसा, बहावा, अर्जुना अशा विविध आयुर्वेदीक वनस्पतींचा समावेश आहे. याशिवाय लिंब, चिंच, वड, पिंपळ आदी रोपांचाही त्यात समावेश आहे.
संवत्सर गांवचे माजी उपसरपंच कै. केशवराव भाकरे पाटील यांनी त्यांच्या हयातीत अनेक सामाजिक कार्य केलेले असून आपल्या कार्यकाळात संवत्सर गांवच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांचा वारसा पुढेही चालू रहावा त्यांचे स्मरण रहावे यासाठी त्यांचे सुपूत्र श्री.नसुनिल भाकरे यांनी व त्यांचे मित्र आयुर्वेदाचे प्रसारक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी सुमारे एक हजार रोपटे गांवासाठी देऊन आज बुधवार रोजी आपला संपर्क पुर्ण केला.
उपसरपंच विवेकभाऊ परजणे यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद करुन आयुर्वेदासारखे अनेक प्रकारची रोपे दान करून भाकरे परिवाराने आजारी माणसांना जिवनदान देण्याचे मोठे कार्य केले आहे. आज लावलेली रोपे भविष्यात मोठी होऊन सावलीबरोबरच जिवनदान देण्याचे काम करणार आहेत. शिवाय झाडांमुळे पर्जन्यमान चांगले होऊन परिसर सुशोभित होण्यास चांगली मदत होणार आहे. तर आयुर्वेदाचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी झाडे ही गावाची संस्कृती आणि परंपरा असून झाडांमुळे शुध्द ऑक्सीजन माणसांना मिळतो. परिणामी आरोग्य चांगले राहण्यास मदतही होते.