आदिनाथ ढाकणेआपला जिल्हा

कोपरगावच्या प्रज्वल ढाकणे चे जिल्हास्तरीय योग स्पर्धेत घवघवीत यश

कोपरगावच्या प्रज्वल ढाकणे चे जिल्हास्तरीय योग स्पर्धेत घवघवीत यश

दोन गोल्ड, एक सिल्वर तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील गौरव

कोपरगाव विजय कापसे दि २० जुलै २०२४नुकतीच संगमनेर येथे संपन्न झालेल्या अहमदनगर जिल्हा योगासना स्पर्धेत कोपरगाव येथील योगपट्टू प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांने दोन गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल मिळवले असून त्याला जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील गौरवण्यात आले असल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मालपाणी लॉन्स मध्ये अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन तसेच ब्रिहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे नुकतेच अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक योगा खेळाडू सहभागी झाले होते. त्यात कोपरगाव येथील योगपटू प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांनी देखील सहभाग नोंदवत योगाच्या पारंपारिक स्पर्धेत पहिला क्रमांक, एकल स्पर्धेत दुसरा क्रमांक तर तलात्मक जोडी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत दोन गोल्ड मेडल, एक सिल्वर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन करत सर्वांची शबासकी मिळवत संपूर्ण योगा स्पर्धेत जिल्ह्यातील “बेस्ट ऑफ द योग पटू” खेळाडू म्हणून देखील प्रज्वलचा गौरव झाला आहे.

जाहिरात

याप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी, सचिव उमेश झोटिंग ट्रेझर कुलदीप कागदे आदी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला असून प्रज्वलच्या या यशा बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून याआधी देखील प्रज्वलने अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत सहभागी होऊन अनेक बक्षीस मिळवून नावलौकिक मिळवला आहे.

जाहिरात
प्रज्वल ढाकणे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे