विखे-पाटील

औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय

जाहिरात

शिर्डी दि.३१ जूलै २०२४ (उमाका) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील,‌ उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, विकास आयुक्त डॉ.दीपेंद्रसिंह खुशावत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह उद्योजक कौस्तुभ धवसे, गणेश निबे व इतर औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

शिर्डी एमआयडीसी परिसर हा ५०२ एकर असून यातील २०० एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्यमंत्रीमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

जाहिरात

सदरचा निर्णय हा शिर्डी, अहमदनगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असून यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल. असा विश्वास महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे