डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियानास सुरूवात
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियानास सुरूवात
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयात ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियानास सुरूवात
नगर विजय कापसे दि १७ डिसेंबर २०२४: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळदघाट, अहिल्यानगर मध्ये डॉ. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी महाविद्यालय विळदघाट मध्ये ‘देश का प्रकृती परिक्षण’ अभियान राबविण्यात आले. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2024 रोजी देश का प्रकृती परिक्षण अभियान सुरू केले असून या अभियानासंदर्भात आज दि. 17 डिसेंबर 2024 रोजी कृषी महाविद्यालयात 18 पेक्षा जास्त वय असलेल्या विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परिक्षण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे होते. तसेच गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ए. टी. देशमुख, सहयोगी प्राध्यापक स्वास्थ्यवृत्त विभाग प्रमुख तसेच डॉ. यु. व्ही. सलगरे (पाटील), रचना शारीरिक विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. राऊत, रोसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. दांगडे, डॉ. एम. एस. अनारसे, डॉ. डी. एम. नलावडे, प्रा. एस. बी. डमाळ उपस्थित होते.
यावेळी डॉ. ए. टी. देशमुख यांनी मानवी प्रकृती विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. यु. व्ही. सलगरे यांनी प्रकृती परिक्षण ॲप विषयी माहिती दिली व डाऊनलोड झालेल्या ॲपचे आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे प्रकृती परिक्षण पूर्ण करण्यात आले. यावेळी डॉ. मधुकर धोंडे यांनी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभागी होवून आपल्या प्रकृतीचे परिक्षण करुन घ्यावे असे आवाहन केले आणि योग्य ते मार्गदर्शन करून अभियानास शुभेच्छा दिल्या. या अभियानासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एस. अनारसे यांनी केले.