संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य गंगा गोदावरी महाआरती संपन्न
हर हर गंगेच्या जयघोषात गोदाकाठ दुमदुमला अभूतपूर्व गर्दी
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२४–संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तथा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय देखणा सोहळा कोपरगाव गोदावरी घाट येथे पाहण्यासाठी आणि गंगा गोदामातेचे पूजन करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेवांच्या जयघोषात अवघा गोदाकाठ दुमदुमला होता.युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि सौ.रेणुकाताई कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून शिवशंकर महादेवाचे पूजन केले.नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मन जिंकत असते. यामुळे जागवूया ज्योत माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो.सामाजिक जाणीव जपण्याचे काम सर्व युवासेवकांच्या मेहनतीतून केले जाते ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होतो आहे.
गंगा आरती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी असणाऱ्या बोटीतून फटाके अवकाशात झेपावत आतिषबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लखलखाट करत होते.